नियमांचे पालन करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा

नियमांचे पालन करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा

आदित्यनाथ महाराज : दिपावली निमित्त कल्याण रोडवर फटाका विक्री स्टॉल सुरु

वेब टीम नगर –  दिपावली सणाची लगबग व तयारी सुरु झाली आहे. नगरच्या फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने कल्याण रोडवर होलसेल फटाका विक्रीचे स्टॉल सुरु केले आहेत. श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांचे शिष्य आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते फटाका विक्रीचे स्टॉलचे व प्रवेशद्वाराचे उत्घाटन करण्यात आले. यावेळी फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव संतोष बोरा, उपाध्यक्ष सोमनाथ रोकडे, सहसचिव अरविंद साठे कार्याध्यक्ष सुरेश जाधव आदींसह सदस्य उपस्थित होते.

आदित्यनाथ महाराज म्हणाले, काही दिवसात दिवाळी सण सुरु होणार आहे. या सणासुदीच्या दिवसात सर्व नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःची काळजी घेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा. फटाका व्यापारी असोसिएशनचे सर्व व्यावसायिक सामाजिक कामातून व्यवसाय करत चांगले उपक्रम राबवत आहेत.

             अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले, करोनामुळे भयभीत झालेल्या जनतेला भगवंताने व साधू संतांनीच आधार दिला. करोना व लॉकडाऊन मुळे सर्वत्र जे नैराश्याचे वातावरण झाले होते ते आता दिवाळी आल्याने बदलणार आहे. नागरिकांनी उत्साहात दिवाळी साजरी करावी व फटाके खरेदी करावे. फटाका व्यापारी असोसिएशनला प्रशासनाने भरपूर सहकार्य केले आहे. त्यामुळे राज्यात सर्वप्रथम नगरच्या व्यापाऱ्यांना परवाना उपलब्ध करून दिल्याने लवकर स्टॉल सुरु करता आले.

            संतोष बोरा म्हणाले, करोना प्रादुर्भावाचा परिणाम फटाका व्यवसायावर झाला आहे. यावर्षी फटाका विक्रीचे स्टॉल कमी झाले आहेत. तरी भरपूर उत्साह आहे. नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी या ठिकाणाहून प्रसिद्ध कंपनींचे फटाके खरेदी करून आनंदात दिवाळी साजरी करावी.

       यावेळी, देविदास ढवळे, अनिल टकले, अमोल तोडकर, उमेश क्षिरसागर, साहेबराव गारकर, अविनाश जिंदम, संभाजी कराळे,  राजु छल्लाणी , सुनील गांधी, सिद्धांत लयचेट्टी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments