"सहजयोग" च्या अध्यक्षपदी श्रीनिवास बोज्जा,
उपाध्यक्षपदी चंद्रकांत रोहोकले, सचिवपदी मेजर कुंडलिक ढाकणे.
वेब टीम नगर - सहजयोग चॅरिटेबल ट्रस्ट च्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड सहज भुवन गोविंदपुरा अहमदनगर येथे नुकतेच सर्व साधारण सभे मध्ये झाली. प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांच्या परम कृपेत सहजयोग चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था अहमदनगर शहारा मध्ये सहजयोगी साधकांनी स्थापन केली असून गेले १५ वर्षांपासून या संस्थेच्या माध्यमातून सहजयोग प्रचार प्रसाराचे कार्य तसेच सामाजिक कार्य अविरत चालू आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन ध्यान साधना करतात. सदरचे कार्य हे पूर्णपणे सामाजिक स्वरूपाचे आहे.
या बैठकी मध्ये सर्वानुमते बिनविरोध कार्यकारणी व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्षपदी चंद्रकांत रोहोकले, सचिवपदी मेजर कुंडलिक ढाकणे, सहसचिवपदी अंबादास येन्नम व खजिनदारपदी गणेश भुजबळ यांची निवड करण्यात आली असून कार्यकारणी सदस्य म्हणून अभय ठेंगणे, अमित बुरा, सुहास रच्चा, किरण येनगंदुल, सुलभा सोलट व सुनिता शिंदे तसेच निमंत्रित सदस्य म्हणून सुधीर सरोदे, डॉ.दीपक जाधव, राजू द्यावनपेल्ली व चंद्रशेखर सोनवणे यांची निवड करण्यात आली.\
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्रीनिवास बोज्जा म्हणाले माझ्यावर जो विश्वास सर्व सदस्यांनी मिळून दाखविला त्याबदल सर्वांचे आभार मानले व सहजयोगाचे कार्य हे यापुढे आणखी जोमाने अहमदनगर शहारा मध्ये केले जाईल. सर्वाना मिळून कार्य करण्यात येईल यासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
उपास्थीतांचे स्वागत गणेश भुजबळ यांनी केले तर आभार मेजर कुंडलिक ढाकणे यांनी मानले.
0 Comments