आरोग्य आहार
दही साबुदाणा
साहित्य: एक वाटी भिजवलेला साबुदाणा, एक वाटी काकडीच्या फोडी, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, दोन चमचे शेंगदाणे, चार ते पाच काजू, दीड वाटी ताजे गोड दही, एक हिरवी मिरची, जिरेपूड, मीठ, आले, संत्री व मोसंबी च्या तीन ते चार फोडी व थोडे काळे मीठ.
कृती: प्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी भिजवलेला साबुदाणा, त्यामध्ये काकडी, डाळींबाचे दाणे संत्री-मोसंबी च्या, फोडी, त्याचप्रमाणे शेंगदाणे घालावे. त्यानंतर चवीनुसार मीठ, काळे मीठ, जिरेपूड आले घालावे. फळांच्या फोडी असल्यामुळे साखर घालण्याची गरज नाही. त्यामध्ये दीड वाटी ताजे गोडसर दही घालून चांगले हलवून घ्यावे.
फोडणी करताना अगदी कमी तेल वापरावे. त्यामध्ये जिरे, हिरवी मिरचीचे तुकडे आणि काजू काप घालावेत. तर फोडणी वरील मिश्रणात घालावी.
वरील सर्व पदार्थांमुळे प्रोटीन फायबर युक्त, डिश बनते.
0 Comments