'त्या' पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई करा

 'त्या' पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई करा  


यशस्विनी महिला ब्रिगेडची मागणी

मसाज पार्लरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचे अश्‍लील चाळे

 वेब टीम नगर: कोतवाली पोलिस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांचा मसाज पार्लरमध्ये महिलेसोबतचा अश्‍लील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी अशी मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोतवाली पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी मसाज पार्लरमध्ये महिलेसोबत अश्‍लील वर्तन करताना दिसत असल्याचा व्हिडिओ हाती लागला आहे. पोलीस खात्याला कलंकित करणारे हे कृत्य आहे. हे दोन्ही कर्मचारी पोलिस निरीक्षकांच्या मर्जीतील असून हप्ते गोळा करणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. या दोघांना वरिष्ठ अधिकार्‍यांचे पाठबळ मिळत असल्याचे त्यांची हिंमत वाढली आहे. 

याच शहरात पोलिसांची बदनामी होऊन महिलावर्गात देखील भिती वाढेल. या प्रकरणाची पारदर्शी निष्पक्षपातीपणे अतिरिक्त पोलीस अधिक्षकां मार्फत चौकशी करावी. मसाज पार्लरवाल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकण्याची धमकी या दोघा पोलीसांनी दिल्याने त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास कोणी पुढे येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तातडीने सदर प्रकरणी चौकशी करुन चुकीचे काम करणार्‍या पोलिसांना निलंबित करावे, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा रेखा जरे पाटील यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments