आरोग्य आहार
गुळाची दशमी
साहित्य
:
२
वाटी कणिक
१
१/२ हरभरा डाळीचे
पीठ
२
वाटी किसलेला (सेंद्रिय गुळ)
बडीशेप
पावडर
ओवा
मीठ
वेलची पावडर
कृती
:
प्रथम
दोन वाटी गुळामध्ये गूळ बुडेल इतके पाणी घालून गुल वीरगळवून घ्यावा.
कणिक, डाळीचे पीठ एकत्र करून घ्यावे . त्यामध्ये २ चमचे बडीशेप पावडर १/२ चमचा वेलची पावडर, १/२ चमचा ओवा , किंचित मीठ व एक चमचा तेल टाकून मिक्स करावे .विरघळला गुळाच्या पाण्यात पीठ मळून घ्यावे. गुल विरघळवून घेताना पाणी खूप कमी घालावे म्हणजे दशमी गोड होते .
पिठाचे
माध्यम आकाराचे गोळे करून जरा जाडसर पोळ्या लाटून घ्याव्यात. तव्यावर साजूक तूप सोडून गुलाबी रंगावर दशमी खरपूस भाजून
घ्यावी.
शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करणे.
पोषण मूल्य :
यात वापरलेल्या भरपूर सेंद्रिय गुळामुळे आयर्न मिळते. त्याचप्रमाणे कणके मुळे काटर्बोहायड्रेट्स ,हरभरा डाळीमुळे प्रोटीन मिळते, बडीशेप
ओवा यामुळे पचनासही सोपे होते. साजूक तूप मुळे गुड फॅट्स मिळतात.
अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५
* Dietitian and Nutritionist
* B.Sc in Food Science and Nutrition
* Diploma in Nutrition and Health Education
* Diploma in Yog Shikshak
0 Comments