'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेने घेतला वेग' घरोघरी जाऊन कोरोनादूत करत आहेत सर्वेक्षण

 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेने घेतला वेग'
घरोघरी जाऊन कोरोनादूत करत आहेत सर्वेक्षण

चाचण्यांची संख्या वाढविण्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश

           वेब टीम   नगर: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेने आता जिल्ह्यात गती घेतली असून गावोगाव कोरोनादूत जाऊन सर्वेक्षण करत आहेत. मात्र तालुकास्तरीय यंत्रणांनी ही माहिती वेळेवर पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत. तसेच, न्टीजेन चाचणी करतानाच लक्षणे जाणवणार्‍या रुग्णांचे घशातील दोन वेळ स्त्राव घेण्यात यावे आणि त्यातील एक आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठवावा, असे त्यांनी सांगितले.=

            जिल्हाधिकारी . द्विवेदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणांशी संवाद साधून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी  डॉ. दादासाहेब साळुंके आदी यावेळी उपस्थित होते. तालुकास्तरावरुन सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी सहभागी झाले होते.

            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम २४ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. २५ ऑ्क्टोबरला या मोहिमेचा समारोप होणार आहे. जिल्हयात एकूण १६१७ पथकांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबांना भेट देऊन त्यांची माहिती घेतली जात आहे. आपले कोरोनादूत घरोघरी जाऊन हे काम करत आहेत. मात्र, केलेल्या सर्वेक्षणाची माहिती वेळेवर पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आह

            जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे जाणवणार्‍या रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. आपण जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढविली आहे. त्यामुळे अॅन्टीजेन चाचण्यांबरोबरच रुग्णांचे घशातील स्त्राव नमुने आरटीपीसीआर लॅबमध्ये पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जास्तीत जास्त प्रमाणात चाचण्या करुनच आपण जिल्ह्यातील संभाव्य रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यापासून इतरांना होणारा संसर्ग रोखण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे याबाबत तालुकास्तरीय यंत्रणांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले 

           घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. अशावेळी कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक माहितीही घेतली जात आहे. अशावेळी ज्या सदस्यांना लक्षणे जाणवत आहेत, त्यांना चाचणीसाठी संदर्भित करण्याच्या सूचनांची अंमलबजावणी केली जावी. तालुकास्तरावर सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून गेल्या सहा महिन्यात ज्याप्रमाणे काम केले आहे, तसेच काम आगामी दोन महिन्यात करावे लागणार आहे, यादृष्टीने नियोजन करावे. काम करताना कोठेही हलगर्जीपणा जाणवणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी  द्विवेदी यांनी केल्या

Post a Comment

0 Comments