अनिल अंबानींना विकावे लागले पत्नीचे दागिने

 अनिल अंबानींना  विकावे लागले पत्नीचे दागिने

 अनिल अंबानी सध्या हलाखीच्या परिस्थितीत  आहेत

वेब वृत्त संस्था लंडन :

दिवाळखोरीत गेलेल्या उद्योजक अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. न्यायालयीन खटले लढण्यासाठी पत्नीचे दागिने विकावे लागल्याची कबुली अनिल अंबानी यांनी लंडनमधील न्यायालयामध्ये दिली आहे. करोडपती ते रोडपती असा अंबानी यांचा प्रवास त्यांचे औद्योगिक साम्राज्य खालसा झाल्याचे अधोरेखीत करत आहे. विशेष म्हणजे नुकताच भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या राफेल विमानांच्या कंत्राटात अनिल अंबानी यांच्या कंपनीचा सहभाग होता मात्र तरिही राफेल विमाने अंबानी यांचे नशीब बदलू शकले नाहीत.

अंबानी यांनी चीनमधील  ४ हजार ७६० कोटीचे बँकांकडून कर्ज घेतल आहे. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत अंबानी यांनी आपली बिकट आर्थिक परिस्थिती न्यायालयात कथन केली. अंबानी म्हणाले की, ''मी एक सामान्य जीवन जगत आहे. एकच गाडी वापरत आहे. आता पूर्वीसारखे माझे आयुष्य सुखासुखी राहिलेले नाही. इतकंच काय तर न्यायालयीन खटल्यांचा खर्च हा पत्नीचे दागिने विकून भागवला आहे'', अशी कबुली त्यांनी दिली. मागील सहा महिन्यात पत्नीचे ९ कोटी ९० लाखांचे दागिने विकले आहेत. आता स्वतःजवळ काही किंमती  ऐवज उरलेला नाही, असेही अंबानी यांनी न्यायालयाला सांगितले.

माझ्या कडे केवळ एकाच कार 

आपली आर्थिक हलाखी कथन करताना त्यांनी माध्यमांवर खापर फोडले आहे. माझ्या श्रीमंतीविषयी माध्यमांनी अफवा पसरवल्या, माझ्याजवळ कधीच रोल्स रॉयस ही आलिशान मोटार नव्हती. आताही केवळ एकच कार आपल्या सोबत आहे, असे अंबानी यांनी सांगितले. या सुनावणीत पत्नी टीना अंबानी यांच्या मालमत्तेचा तपशील मागण्यात आला. तसेच अनिल अंबानी यांना खासगी हेलिकॉप्टर , याॅट, लक्झुरी मोटार, लंडन, कॅलिफोर्निया आणि बिजिंगमधील शाॅपींगसंबधी प्रश्न विचारण्यात आले.

Post a Comment

0 Comments