स्थळी काष्ठी पाषाणी गणपती पाहणारा अवलिया कलावंत

 स्थळी काष्ठी पाषाणी गणपती पाहणारा अवलिया कलावंत 



नगर-बँकेत नौकरी करता करता पेन्सिल स्केचचा कधीकाळी जोपासलेला छंद पुन्हा एकदा डोकं वर काढता काढता बॉलपेनानं कागदावर रेखाटलेली काही चित्र मनात रुंजी घालू लागली आणि बघता बघता 40-50 गणपतीची स्केचेस कागदावर अवतरली बँकेतल्याच एका कर्मचाऱ्याने ह्या चित्रांच प्रदर्शन का भरवत नाही असं विचारलं मग वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पहिलं-वहिलं छोटसं प्रदर्शन भरलं बँकेत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते चांगलंच भावलं . तेथून पुढे दरवर्षी एक प्रदर्शन भरवायचंच असा शिरस्ता पडला. बघता बघता विविध माध्यमातून साकारलेल्यागणपती प्रदर्शनाला २५वर्ष लोटली त्यामुळे हजारो गणपतींच्या कलाकृतींनी त्यांच्या घरातलं दालन गणेश मूर्तींनी भरून गेलं त्या अवलिया कलाकाराचं नाव राजेंद्र वहाडणे.


कागद पेनापासून सुरू केलेल्या या उपक्रमात कागद कुंचला, छिन्नी-हातोडा,काष्ठ, सिपोरेक्स,साबण,माती,मेणानी अशी विविध माध्यम समाविष्ट होत गेली. विविध शैलीतील गणपती विविध माध्यमातून साकारले जाऊ लागले स्थळी-काष्ठी-पाषाणी राजेंद्र वहाडणेना गणपती आणि त्याचे विविध आकार दृष्टीस पडतात असं म्हंटल तर अजिबातच वावगं ठरणार नाही.


फक्त नगरातच नव्हे तर बाहेरगांवीही त्यांची प्रदर्शनं भरू लागली साताऱ्यात भरलेल्या एका प्रदर्शनात जेष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी भेट दिली त्यांनी वहाडणेंच्या चित्रांची खूप प्रशंसा केली. दस्तुरखुद्द बाबूजींचे ते शब्द अजूनही वहाडनेनच्या मनात घर करून आहेत. 


मागच्या वर्षी त्यांनी शाईच्या पेनने चितारलेली गणपतीच्या चित्रांची मालिका भाव खाऊन गेली दरवर्षी नवीन काही करण्याच्या त्यांचा मनसुबा श्रीगणेशाच्या कृपेने सफल होतोच.दरवर्षी त्यांना काही नवीन माध्यम सापडतं आणि त्यातून वेगळ्या शैलीतले गणपती प्रकट होत राहतात.यंदाही त्यांनी कागद कोळसा आणि खोडरबर यांच्या माध्यमातून गणेश चित्रांची एकचित्रमालिका तयार केली आहे . त्यात चित्रकलेच्या कागदावर कोळसा लावून खोडरबरने गणेश चित्रे काढली आहेत

Add caption
मालिका तयार केली आहे.सालाबादप्रमाणे तीही प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही.


राजेंद्र वहाडणेंच्या चित्र-मूर्ती संग्रहात यंदाच्या कलाकृतींची भर पडणार आहे वहाडणेंना अशीच गणेश चित्र साकारण्याची प्रेरणा मिळत राहो याच त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा

Post a Comment

0 Comments