शहर भाजपाच्या संपर्क अभियानास शुभारंभ
130 कोटी भारतीयांचा वर्तमान व भविष्यकाळ
पंतप्रधान नरेंद्र मोदीच उज्वल करतील - महेंद्र गंधे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या दुसर्या टर्मच्या प्रथम वर्षपूर्तीबद्दल भारतीय जनता पार्टीने राबविलेल्या ‘मोदी सरकार द्वितीय वर्षपूर्ती संपर्क अभियान’ चा शुभारंभ नगर शहरात शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने शनी चौकात करण्यात आला. यावेळी नागरिकांना घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जनतेला लिहिलेल्या पत्राच्या छापिल प्रतींचे वाटप व कोरोना विषाणुपासून बचाव होण्यासाठी मास्क देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, मध्यमंडल अध्यक्ष अजय चितळे, माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी, सभापती लता शेळके, सुवेंद्र गांधी, सचिन पारखी, किशोर बोरा, अॅड.विवेक नाईक, अमित गटणे, हरिभाऊ डोळसे, प्रशांत मुथा, मल्हार गंधे, तिवारी, तावरे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. कापड बाजारातील दुकानदारांनाही यावेळी पत्रकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सुनिल रामदासी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांच्या कारकर्दीत देशात केलेले कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने विशेष संपर्क अभियान सुरु केले आहे. या अभियानामुळे भारतीय जनता पार्टीचा संपर्क घरोघरी होणार आहे.
प्रास्तविक नरेंद्र कुलकर्णी यांनी केले तर आभार सचिन पारखी यांनी मानले. मोदी सरकार द्वितीय वर्षपूर्ती संपर्क अभियान नगर शहरानंतर सावेडी, केडगांव, भिंगारमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
0 Comments