व्यवहारचक्र सुरू


व्यवहारचक्र सुरू 


अर्ध्या अधिक शहरातील दुकाने उघडली ,रस्ते गर्दीने गजबजले 

वेब टीम नगर,दि. २२ -तब्बल ६६ दिवसांच्या लॉक डाऊन नंतर आज नगर शहरातील अर्ध्या भागातील दुकानांची फडताळ उघडली गेल्याने शहरातील आणि उपनगरातील व्यवहार चक्र काहीसे सुरू झाल्याचे चित्र नगर शहरात पाहायला मिळाले. जिल्ह्यांतर्गत एसटी सेवाही सुरू झाल्याने लालपरीची चाकेही आज पहिल्यांदाच रस्त्यावरून धावतांना पाहायला मिळाली .
जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा अंतर्गत आज नगर -वाम्बोरी ,नगर-श्रीरामपूर ,नगर-पारनेर अश्या एसटी च्या बसेसच्या काही फेऱ्या झाल्या . मात्र अगदी तुरळक प्रवासी या गाड्यांमधून प्रवास करतांना दिसले. मात्र जसजसे एसटी सुरू झाल्याचे नागरिकांना  माहीत होईल तस-तसा  एसटीने प्रवासा करण्याचा कल वाढेल. सध्या आसनांच्या निम्म्या क्षमतेनेच गाड्या धावणार असल्याचे एसटीच्या  अधिकाऱयांकडून सांगण्यात आले आहे. 

  शहरातील दिल्लीदरवाजा भागातील दुकाने उघडल्याने आज व्यवहार सुरू झाले छायाचित्रात दिल्ली दरवाजा शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील उघडी असलेली दुकाने दिसत असून त्यामुळे दिल्ली दरवाजा भागातील रस्तेही गजबजलेले दिसले . काही भागात रिक्षाही धावतांना दिसत होत्या . 

Post a Comment

0 Comments