डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आकाशवाणी वर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आकाशवाणी वर विशेष कार्यक्रमाचे आयोजन 


वेब टीम नगर,दि.१२ - भारतातील बौद्ध धर्माचे पुरस्कर्ते, जागतिक कीर्तीचे महामानव , भारतीय घटनेचे शिल्पकार , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आकाशवाणी एफ.एम १००. १ वर विशेष कार्यक्रम सादर होणार असल्याची माहिती लेखिका सुषमा अमर (पत्रकार ,कॉम्रेड भास्करराव जाधव  यांची कन्या ) यांनी कळवले आहे.१४ एप्रिल रोजी सकाळी १०.३५ ते १०.५५ पर्यंत सादर होणाऱ्या या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार , वृत्तपत्रकार छायाचित्रकार प्रकाश भंडारे, फाय फाऊंडेशन पुरस्कार विजेते , जेष्ठ चित्रकार व कवी शिधर अंभोरे आणि न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स च्या संज्ञापन विभागाचे सहाय्य्क प्राध्यापक बापू चंदनशिवे यांचा सहभाग असणारा हा कार्यक्रम पर्वणी ठरणार आहे

Post a Comment

0 Comments