जिल्हास्तरीय आणि विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द
वेब टीम नगर दि. ०२- कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ची घोषणा केलेली आहे. तसेच शासकीय कार्यालयात पाच टक्के उपस्थिती करण्यात आलेली आहे. या कालावधीत माहे एप्रिल २०२० मधील पहिला सोमवार शासकीय सुट्टी असल्याने मंगळवारी दिनांक ७ एप्रिल २०२० रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आणि आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणारा ( दिनांक १३ एप्रिल, २०२०) लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांनी दिली आहे.
सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत, त्याचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
0 Comments