सोशल डिस्टंसिंगची ऐशी - तैशी

सोशल डिस्टंसिंगची ऐशी - तैशी 


 पोलिसांची दंडुकेशाहीही पडली अंगवळणी 




वेब टीम नगर,दि.१  - चितळे रोड  वर भाजी विक्रीस मज्जाव करण्यात आल्याने तसेच गाडगीळ पटांगण येथील भाजी बाजार बंद करण्यात आल्याने नेप्ती नाका ते कल्याण रस्ता परिसरात आज भाजी बाजार भरला होता. या बाजारातील मांसाहाराच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळली होती मात्र लोकांनी सोशल डिस्टंसिंग पाळून मांसाहाराची खरेदी केली . या बाजारात पोलीसही  मोठया प्रमाणात  होते तर आडते बाजार परिसरात धान्य खरेदी साठी दुकानांसमोर मोठ्या रांगा लागल्या  होत्या . येथे सोशल डिस्टंसिंग ची ऐशी तैशी झाली. आडते बाजारात दुतर्फा रांगा लागल्याने गर्दी दिसत होती.





कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासकीय पातळीवरून जोरकस प्रयत्न सुरु असून नगरकर मात्र काही ठिकाणी नियमांचे व शासकीय निर्देशांचे काटेकोर पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नियमांचे पालन न केल्याने पोलिसांकडून होणारी दंडुके शाहीही आता नगर करांच्या अंगवळणी पडू लागली आहे. 

Post a Comment

0 Comments