हमाल - माथाडी कामगार मजुरांना मोफत भोजन

हमाल - माथाडी कामगार मजुरांना मोफत भोजन 


वेब टीम नगर, दि.३१ - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी पाळण्यात येत असलेल्या बंदमुळे ज्या हातावर पोट असलेल्या  गरजूंचे हाल होत आहेत त्यांच्या हाता तोंडाची गाठ पदवी या करीत स्टेशन परिसरातील दत्त हॉटेलचे संचालक दत्ता गायकवाड यांचे वतीने भीमवाडी , बोहोराची चाळ , भीमवाडी समाज मंदिर , व्ही.आर.डी  चौक , इंदिरा नगर परिसरातील हमाल कामगार व मजुरांना गेल्या ३ दिवसांपासून मोफत भोजन वाटप करण्यात येते .

स्टेशन परिसरात गेले ७० वर्षांपासून दत्त हॉटेलचा व्यवसाय करणाऱ्या गायकवाड यांच्या वतीने गेल्या ३ दिवसापासून दररोज १६५-१७५ लोकांना मोफत अन्नदान सुरु आहे . तसेच ५ रुपयात शिव भोजन थाळीही देण्यात येते. कुसूम गायकवाड , वंदना रमेश गायकवाड , अनुराधा प्रकाश भंडारे , कौन्सिलिंग एक्स्पर्ट वायुदलात नि.सार्जंट पियुष गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

गरजूंना अवघ्या ५ रुपयात शिवभोजन व मोफत अन्न पाकिटे मिळाल्याने  सुग्रास भोजन मिळते.   

Post a Comment

0 Comments