पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा
वेब टीम नगर,दि.२८ - संचारबंदीला बाजारहाटेसाठी ढील दिल्यानंतर गाडगीळ पटांगण आणि चितळे रस्त्यावर भाजीबाजार मांडण्यात आला होता . भाजी बाजारात सर्व व्यवहार सुरळीत पणे सुरु असतानाच दुचाकीवर भाजी घेऊन जाणाऱ्या अनेक नागरिकांना पोलिसांनी थांबवून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरवात केली . पाहता पाहता हि संख्या ५० च्या घरात पोहोचली त्यानंतर या सर्वांना पोलीस स्टेशन मध्ये नेऊन त्यांच्यावर कलम १८८ अंतर्गत कारवाई करून तंबी देऊन सोडण्यात आले.
कोतवाली पोलीस ठाण्यात आज १०० जणांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली तर आज तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई केली या सर्वांवर खाजगी वाहने आणल्या बाबत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले .
0 Comments