संकट गंभीर आहे, पण सरकार खंबीर आहे - मुख्यमंत्री
वेब टीम मुंबई ,दि. २४ - कोरोना या संकटावर मात करण्यासाठी सर्वच बाजूंनी हात पुढे येत आहेत. त्या सर्व हातांचं मी स्वागत करतो. आपण एकजूटीने या संकटाचा मुकाबला करतो आहे. मी पुन्हा पुन्हा हेच सांगेल की जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत कुणीही अडथळा आणू नका. अनावश्यक प्रवास टाळा. स्वतःच्याच घरी राहा. सरकारी यंत्रणांवरील ताण वाढेल असं काही करु नका. बाकी इतर सुचना सरकारच्यावतीने तुम्हाला दिल्या गेल्या आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.“केवळ टेहाळणी करायला किंवा फेरफटका मारायला बाहेर पडू नका”
उद्धव ठाकरे म्हणाले, “शहरांमध्ये जीवनावश्यk वस्तूंची ने-आण बंद नाही. ज्या कंपन्या किंवा सकाळ झाली की आपल्याला भाजी, धान्य, औषधं आणण्यासाठी बाहेर पडावं लागतं. आपणही समजुतीने घ्या. यासाठी नागरिक बाहेर पडत असतील तर पोलिसांनी त्याची खात्री करुन समजून घ्यावं. नागरिकांनाही मी सांगतो की केवळ टेहाळणी करायला किंवा फेरफटका मारायला बाहेर पडू नका. घरात राहा, सुरक्षित राहा. घर हेच आपल्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे.“
जीवनावश्यक वस्तू निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना जर काही अडचणी येत असतील तर त्यांनी पोलिसांना १०० क्रमांकावर संपर्क करावा. पोलिस तुम्हाला पूर्ण मदत करतील. मी पोलिसांचे विशेष कौतुक करतो. त्यांनी काही लाख मास्क धाड टाकून जप्त केले. या संकटाचा कुणी संधी म्हणून उपयोग करु नये. काळाबाजार, साठेबाजी होऊ नये. मी याबाबत बैठक घेतली आहे. आपण काळजी करण्याची गरज नाही. आपल्याकडे पुरेसा धान्यसाठा आहे, असंही त्यांनी सांगितलं
0 Comments