अत्यावश्यक दाखले ऑनलाईन मिळणार













अत्यावश्यक  दाखले ऑनलाईन मिळणार 

कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी  प्रतिबंधात्‍मक  उपाययोजना

वेब टीम नगर, दि.१९- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी  प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून जिल्‍हयात नागरिकांची  एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्‍यासाठी जिल्‍हयातील सर्व सेतू व महा ई सेवा केंद्र  तसेच आधार केंद्र  साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा १८९७ अन्‍वये निर्गमित करण्‍यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार दि. ३१ मार्च २०२० पर्यत बंद ठेवण्‍याचे आदेश  जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड १९)  प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी  राज्‍यात साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा १८९७ दि.  १३ मार्च २०२० पासून लागू करण्‍याबाबत  खंड २,३ व४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करण्‍यात आलेली आहे.  त्‍या अनुषांने  जिल्‍हाधिकारी हे त्‍यांच्‍या कार्यकक्षेत्रात कोव्‍हीड १९ वर नियंत्रण  आणण्‍यासाठी  व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी  ज्‍या उपाययेाजना करणे आवश्‍यक  आहे. त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी घोषित करण्‍यात आलेले आहे.
जिल्‍हयातील  ज्‍या नागरिकांना  दाखले अत्‍यावश्‍यक आहेत. त्‍यांनी या दाखल्‍याकरीता आवश्‍यक लागणारी कागदपत्रे स्‍कॅन करुन संबंधीत कार्यालयाच्‍या ई-मेलवर पाठविण्‍यात यावीत. त्‍यामुळे सर्व नागरिकांना ऑनलाईन पध्‍दतीने दाखले वितरीत करण्‍यात येतील.
  या आदेशाचे कोणत्‍याही व्‍यक्‍तीने अथवा संस्‍थेने आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास  भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) यांच्‍या कलम १८८ नुसार  दंडनिय कायदेशीर कारवाईस  पात्र  राहील असे जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणचे अध्‍यक्ष राहुल द्विवेदी यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments