पेपर तपासणीचे काम शिक्षकांना घरूनच करू द्यावे
यासाठी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी मंत्रालयात शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन शाळेत येण्याची शिक्षकांना सक्ती करण्यात येऊ नये, यासाठी आपण तातडीने निर्णय घ्यावा, असे शिक्षक भारतीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
राज्य शासनाने कोरोना ह्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिथे गर्दी जमा होईल असे सर्व धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचे, मोठे-मोठे मॉल्स, सिनेमागृहे अशी सर्व ठिकाणे बंद करण्याचे तसेच ग्रामीण व शहरी भागातील सर्व व्यवस्थापनाच्या सरसकट सर्व शाळा ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच बरोबर महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना ही वर्क फ्रॉम होम योजना तातडीने लागू करा, अशी मागणी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील मोठ्या-मोठ्या कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी कामावर न बोलवता घरूनच त्यांना काम करायला सांगावे असे आवाहन कंपनी मालकांना केले आहे. व आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन सामान्य जनतेला केले आहे. ह्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देखील सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, प्राथमिक राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, तुषार मरकड, संजय तमनर, संभाजी पवार, श्रीकांत गाडगे, विलास गाडगे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर, संपत वाळुंज, नवनाथ घोरपडे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, रोहिदास चव्हाण, किसन सोनवणे, इकबाल सय्यद, राजेंद्र जाधव, संजय पवार, संभाजी चौधरी, अशोक धनवडे, जॉन सोनवणे, रेवन घंगाळे, संतोष मगर, अनिल लोहकरे, अशोक अन्हाड, संतोष देखमुख, योगेश हराळे, काशिनाथ मते, जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, जिल्हा कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी, सचिव विभावरी रोकडे, शंकुतला वाळुंज,संध्या गावडे, अनघा सासवडकर, छाया लष्करे, जया गागरे आदींनी केली आहे.
0 Comments