अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, शिवजयंती निमित्त मोटारसायकल रॅली

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, शिवजयंती निमित्त मोटारसायकल रॅली 


वेब टीम नगर दि.१३ -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतिथी नुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीसाठी शहरातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, शिव प्रतिष्ठाण,तेलीसमाज महासंघ, मंदिर बचाव समिती या चार संघटनानी शिवजयंती निमित्त शहरातून भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन केले. दुचाकी फेरीची सुरुवात पारिजात चौक येथून महापौर बाबाबासाहेब वाकळे यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार घालून केली.
प्रेमदान चौकातून पत्रकार चौक मार्गे दिल्लीगेट येथून चौपाटी कारंजा येथे आल्यावर मयूर बोचूघोळ यांनी रॅलीचे स्वागत केले. नेता सुभाषचौकात शिवसेना कार्यालय जवळ माजी आमदार अनिल राठोड यांनी स्वागत केले यावेळी नगर सेवक दिलीप सातपुते उपस्थित होते.नवी पेठेत वंदे मातरम युवा प्रतिष्ठान यांनी रॅलीचे स्वागत केले. माणिक चौक येथे भाजपाचे किशोर बोरा नगरसेवक संजय  चोपडा यांनी रॅलीचे स्वागत केले. माळीवाडा वेशी जवळ  नगरसेवक संभाजी कदम, दत्ता कावरे ,अनिल शिंदे तसेच माजी नगराध्यक्ष अभय आगरकर  यांनी रॅलीचे स्वागत केले.
रॅली इंपिरिअल चौकात आल्यानंतर शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अशोक सरनाईक, प्रा.मधुसूदन मुळे, सुनील महाजन, बाळासाहेब अनासपुरे ,राजकुमार जोशी ,सुनील कुलकर्णी, कन्हैया व्यास, प्रसन्न खाजगीवाले, संकेत होशिंग,शिरीष जानवे,समीरपाठक, उत्कर्ष आंचवले,ललित पाटील,निनाद बेडेकर,चेतन अमरापूरकर,कृष्णा जोशी,गजाजन कुलकर्णी,निखिलेश हिंगणगावकर,रघुनाथ सातपुते ,मल्हार गंधे,अमोल हुंबे पाटील,शोभा ढेपे,श्रुती देशमुख, प्रिया जानवे , शिवप्रतिष्ठाणचे बापू साहेब ठाणगे, तेलीसमाज महासंघाचे, हरिभाऊ डोळसे, आदी उपस्थित होते,तसेच यानिमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने रक्तदान शिबिराचे जनकल्याण रक्तपेढी याठीकाणी आयोजन केले.संकेत होशिंग,कन्हैया व्यास ,सुनील कुलकर्णी,समीर पाठक आदी तरुणांनी यावेळी रक्तदान केले.

Post a Comment

0 Comments