महिलांनी इंटरनेट, मोबाईल टेक्नोलॉजी आत्मसात करुन आपले स्थान निर्माण करावे
श्रुती रहाणे - ओंकार कॉम्प्युटर्स येथे महिलांसाठी मोबाईल ट्रेनिंग वर्कशॉपवेब टीम नगर,दि. १३ - इंटरनेट, मोबाईल क्रांतीकारीमुळे आज जगाच्या कोणत्याही भागात काय घडामोडी होतात हे क्षणार्धात समजते. हे माध्यम अत्यंत प्रभावी असून त्याच्या वापराने अनेक गोष्टी सहज साध्य होतात. त्यामुळे इंटरनेट, मोबाईल ज्ञान माहिलांनी आत्मसात करुन त्यांचा उपयोग योग्य ठिकाणी करावा. येणार्या काळात प्रत्येक गोष्ट इंटरनेट, मोबाईल यांच्यामुळे लवकरात लवकर उपलब्ध होत आहे. महिलांनी प्रशिक्षणात मागे न राहता नवीन टेक्नोलॉजी आत्मसात करुन आपले स्थान भक्कम निर्माण करावे, असे प्रतिपादन डॉ.श्रुती रहाणे यांनी केले.
जागतिक महिला दिन निमित्ताने सारसनगर येथील ओंकार कॉम्प्युटर्स येथे महिलांसाठी मोबाईल ट्रेनिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.श्रुती रहाणे बोलत होते. यावेळी महिलांना स्मार्ट फोन, अॅनालॉग मोबाईल याबद्दल योग्य मार्गदर्शन तसेच गूगल पे सारख्या ऑनलाईन व्यवहारा बद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी या पूर्ण उपक्रमाचा पुरेपूर फायदा घेतला. वर्कशॉप पूर्ण केलेल्या महिलांना डॉ.श्रुती रहाणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
पुढे बोलताना श्रुती रहाणे म्हणाल्या कि, पस्तीशी ओलांडलेल्या महिलांनी कुटुंबाची काळाजी करता -करता स्वत:कडेही लक्ष द्यावे, त्यासाठी दैनंदिन कामातुन व्यायाम कसा करावा. शरीरातील पित, वात, कफ संतुलित ठेवुन सुखी आरोग्याचा अनुभव घेण्याचे धंडे आपल्याला गिरवता येईल. त्यासाठी माहिलांनी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी खुप काळाजी घेतली तरच पुढील आयुष्य सुखी आणि समृद्धी असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्तविकात संचालिका शितल भुतकर म्हणाल्या कि, महिलांना सक्षम बनविण्यासाठी ओंकार कॉम्प्युटर्सच्या माध्यमातुन हा 15 दिवसीय मोबाईल ट्रेनिंग वर्कशॉप आयोजन करण्यात आले आहे. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट ती सहज उपलब्ध होते. त्यांचे कारण म्हणजे इंटरनेट आणि मोबाईल. म्हणून महिलांना इंटरनेट आणि मोबाईल मधील प्रत्येक नवीन टेक्नोलॉजी सहज हताळता यावा, यासाठीच हा उपक्रम राबविण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
हा उपक्रम यशस्वीतेसाठी ओंकार कॉम्पुटर्सचे इराम पठाण, सुनीता नायर, शिवानी पवार, शितल वाघस्कर, अंजली कोल्हाल, निवेदिता घोडके, स्मिता बळीद, सर्व विद्यार्थिनी विशेष परिश्रम घेतले. या वर्कशॉपमध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल भुतकर यांनी केले तर आभार इराम पठाण यांनी मानले
0 Comments