आनंदऋषीजी हॉस्पिटलचे २५ एकर क्षेत्रामध्ये हॉस्पिटलचे विस्तारीकरण करण्याची गरज
संजीव राहीदासनी - त्वचा रोग तपासणी शिबिरात १७० रुग्णाची तपासणी ..वेब टीम नगर ,दि. १3-आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून आत्याधुनिक व अत्यल्प दरात गरजवंत रुग्णांना मिळणाऱ्या चांगल्या सेवेमुळे हॉस्पिटलच्या विश्वासार्हतेत वाढ होत असून या हॉस्पिटलने २५ एकर क्षेत्रामध्ये या हॉस्पिटलचे विस्तारीकरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी संजीव राहीदासनी यांनी केले .राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या २९ व्या पुण्यस्मृतिदिना निमित्त त्वचा रोग तपासणी शिबिराच्या शुभारंभा प्रसंगी ते बोलत होते ,या शिबिरासाठी नगरमधील इंटरनॅशनल इलेक्ट्रिकल या फर्मचे संचालक राजेंद्र बोरा व परिवाराचे योगदान लाभले . संजीव राहीदासनी यांच्या हस्ते दीप प्रजवलंन करून या शिबिराचे उदघाटन झाले .
या वेळी प्रमिला बोरा ,कल्पना बोरा ,मेघा ,लक्ष्मी , मयुरी व पल्लवी बोरा ,सतीश डुंगरवाल , आशा डुंगरवाल ,सर्वश्री .विनोद ,मयूर ,निखिल ,महावीर व शुभम बोरा व परिवाराचे सदस्य उपस्थित होते . संजीव राहीदासनी यांनी याप्रसंगी जैन सोशल फेडरेशनच्या कार्याचे कौतुक केले .व खऱ्या अर्थाने भगवान महावीर यांच्या अहिंसो परमोधर्म या संदेशानुसार या हॉस्पिटलचे रुग्णसेवेचे कार्य सुरु असून भविष्यातील चागल्या सेवा कार्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . संतोष बोथरा यांनी सर्वांचे स्वागत करून हॉस्पिटलच्या कार्या विषयी सविस्तर माहिती दिली. आचार्य श्रीं चे आशीर्वाद व प्रबुद्ध विचारक पुज्य .आदर्शऋषीजींचे अमूल्य मार्गदर्शन यासाठी कायम लाभत असून यापुढेही अशीच उत्तमोत्तम सेवा देण्यास आम्ही बांधील आहोत असे सांगून सर्व योगदात्या परिवाराचे आभार मानले .राजेंद्र बोरा यांनी मनोगत व्यक्त करताना हॉस्पिटलच्या संचालकांचे आभार मानले व अश्या या पुण्यसेवा कार्याच्या यज्ञात आम्हाला दिलेल्या सहभागाबद्धल ऋण व्यक्त केले,या शिबिरात १७० रुग्णाची तपासणी करण्यात आली. तपासणी डॉ .भास्कर पालवे ,व अमित शिंदे यांनी करून रुग्णांना मार्गदर्शन केले .बोरा परिवाराचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला,दि,१४ मार्च रोजी प्रोस्टेड ग्रंथी ,लघवीचे विकार ,मुतखडा तपासणी व . उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरजवंतांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जैन सोशल फेडरेशनने केले आहे .
0 Comments