प्रज्ञाशोध परीक्षेतून भावी पिढी घडेल
बाबासाहेब वाकळे - अहमदनगर प्रज्ञाशोध परीक्षेचे पारितोषिक वितरण उत्साहातवेब टीम नगर,दि. १० - प्रज्ञाशोध परीक्षेतून विद्यार्थी घडतात पुढील शिष्यवृत्ती परीक्षेची हि चाचणी परीक्षा असल्याने ही परीक्षा महत्वाची आहे.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून उत्तम यश संपादन करून देशाचे,आई-वडीलांचे ,शाळेचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करावा.परीक्षेत यश मिळवल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.प्रज्ञाशोध परीक्षेतून भावी पिढी भावी पिढी घडेल.असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केल.
केडगाव देवी रोडवरील डॉ.हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान आयोजित अहमदनगर प्रज्ञाशोध परीक्षेचे पारितोषिक वितरण उत्साहात झाले.याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे बोलत होते.याप्रसंगी डॉ.हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम ढवाण,रा.स्व.संघाचे जिल्हासंपर्क प्रमुख कैलास गाडीलकर,पुणे विद्यापीठाचे उप कुलसचिव डॉ गोकुळदास लोखंडे,उप कुलसचिव प्रा.डॉ.अजय ठुबे, कोषाध्यक्ष अरुणराव धर्माधिकारी,कार्यवाह सोमनाथ दिघे,सह कार्यवाह ॲड . मुरलीधर पवार,माजी प्राचार्य के.डी.कुलकर्णी,प्राचार्य डॉ.रवींद्र चोभे,प्रा.दादासाहेब काजळे,दत्तात्रय जगताप,नगरसेवक रवींद्र बारस्कर,अजय चितळे,प्रा.अ.शा.कुमावत,प्रा.भांडारकर,प्रा.पारधे,विद्यार्थी प्रतिनिधी अनुश्री दीक्षित, गिरीश पुरोहित आदी उपस्थित होते.
उपकुलगुरू डॉ.गोकुळदास लोखंडे म्हणाले की,स्वप्ने सत्यात उतरवायची असेल तर स्पर्धेत विद्यार्थी टिकवण्यासाठी आधुनिक दृष्टीकोन ठेवा.विद्यार्थ्यांचे गुण ओळखता यावे.यासाठी विद्या प्रतिष्ठानने प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चुणूक ओळखण्याची सामाजिक जबाबदारी घेतली आहे.ही परीक्षा पारदर्शक,निरपेक्षपणे,विस्वासाहर्तेने घेतली जाते.येथे गुणवतेचा शोध घेतला जातो.
कैलास गाडीलकर म्हणाले कि,प्रज्ञावान,प्रज्ञाशील विद्यार्थ्यांचा शोध घेणे कठीण काम आहे.गुणवत्ता असलेले विद्यार्थी निवडून त्यांचे कौतुक केले जाते.ही संस्था रत्नपारखी सारखी भूमिका पार पडत आहे. याच परीक्षेतून विद्यार्थी भविष्य काळात (आय.पी.एस) कलेक्टर,इंजिनीअर,सैन्यदलातील अधिकारी होतील.ज्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनीअर,सिव्हिल इंजिनीअर व्हायचे आहे.अश्या १० विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च व आवश्यक ते मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. डॉ.अजय ठुबे म्हणाले कि,प्रज्ञा शोध परीक्षा हा संस्थेचा स्तुत्य उपक्रम आहे.विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. डॉ.हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम ढवाण म्हणाले कि,गेल्या ३० वर्षांपासून प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जात आहे.विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपमध्ये प्राविण्य मिळवावे यासाठी पूर्व तयारीसाठी हि परीक्षा आहे.अनेक संस्था स्पर्धा परीक्षा घेत आहेत.परंतु प्रामाणिकपणे,निरपेक्षपणे,गुणवत्तापूर्वक विद्यार्थ्यांचा बुद्धयांक शक्ती शोध घेण्याचे कार्य या संस्थेमार्फत केले जाते.स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करतो.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविणात आले.प्रास्तविक प्राचार्य डॉ.रवींद्र चोभे यांनी केले.सूत्रसंचालन शुभांगी सराफ व सायली पांडव यांनी केले.तर आभार प्रा.भांडारकर यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
0 Comments