अमोल भांबरकर यांचे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
प्रा.शिरीष मोडक : हिंदसेवा मंडळातर्फे सत्कारवेब टीम नगर,दि. ५-अमोल भांबरकर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे.त्यांनी प्रामाणिकपणे २० वर्षापसून सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,क्रीडा अश्या सर्वच क्षेत्रात पत्रकारितेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केले आहे.त्यांच्या चांगल्या कार्याची पावती म्हणून ''महाराष्ट्र समाजरत्न'' पुरस्कार देऊन गौरव केला आहे.त्यांची निवड सार्थ आहे.असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले.
दादा चौधरी विद्यालयात विश्वहिंदु परिषदेचे प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर याना नुकताच महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार हिंदसेवा मंडळातर्फे करण्यात आला.याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक,मानद सचिव संजय जोशी,कार्याध्यक्ष अजित बोरा, उपकार्याध्यक्ष डॉ.पारस कोठारी,मराठी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी,दादा चौधरी विद्यालयाचे अध्यक्ष ॲड . सुधीर झरकर,सेवक प्रतिनिधी विठ्ठल ढगे, सहा.सचिव बी.यु.कुलकर्णी,प्राचार्य सुनिल सुसरे,दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुदगल,मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले,शिक्षकेतर महामंडळाचे पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे,दिलीप परसपाटकी, देविदास खामकर, महादेव राऊत,प्रा.मंगेश भुते,अमोल कदम,संदेश पिपाडा,गजेंद्र गाडगीळ,सुजय रामदासी,मनोज हिरणवाळे आदींसह शिक्षक उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना अमोल भांबरकर म्हणाले कि,हिंदसेवा मंडळाने केलेला सत्कार हा अत्यन्त महत्वाचा आहे. हिंदसेवा मंडळाचा जिल्ह्यात नावलौकिक आहे.या सत्कारामुळे समाजासाठी आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळत राहील.हिंदसेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे आभार.
0 Comments