सेनापती दादा चौधरी मराठी शाळेस परिमल ,प्रमोद चौधरी फाउंडेशन तर्फे चार लाख एकावन्न हजार रुपयांची देणगी
वेब टीम नगर,दि. ३ -प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व कार्यकारी संचालक प्रमोद चौधरी यांनी हिंदसेवा मंडळाच्या सेनापती दादा चौधरी मराठी शाळेस नुकतीच सदिच्छा भेट दिली.बाल विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले.शाळेतील वर्ग भेटीत प्रमोद चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.प्रमोद चौधरी यांना टिळक विद्यापीठाची ''डी. लिट" पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा शाळेतर्फे विशेष गौरव करून मराठी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक,मानद सचिव संजय जोशी,कार्याध्यक्ष अजित बोरा,उपकार्याध्यक्ष डॉ पारस कोठारी,माजी मानद सचिव सुनिल रामदासी,प्राज इंडस्ट्रीजचे शाळा समन्वयक अधिकारी विनायक केळकर,दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन अँड सुधीर झरकर,रणजित श्रीगोड,सेवक प्रतिनिधी विठ्ठल ढगे,सहा.सचिव बी.यु.कुलकर्णी, प्राचार्य सुनिल सुसरे,दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुदगल,दिलीप परसपाटकी आदींसह सर्व शिक्षक उपस्थित होते.हिंदसेवा मंडळाच्या सेनापती दादा चौधरी मराठी शाळेस प्रमोद चौधरी यांनी परिमल व प्रमोद चौधरी फाउंडेशन तर्फे चार लाख एकावन्न हजार रुपयांचा धनादेशाची देणगी शाळेचे अध्यक्ष सुमतीलाल कोठारी व मुख्याध्यापक सुभाष येवले यांच्याकडे सुपूर्द केली.याप्रसंगी हिंदसेवा मंडळाच्या पदाधिकारी यांनी शाळेत मागील ५ व ६ वर्षांपूर्वी केलेल्या विविध विकास कामाची माहिती दिली.
बालवाडी ते ४थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक,कथाकथन,इंग्रजी नाटिका,भाषणे,इंग्रजी व मराठी स्वागत गीते सादर केली.विद्यार्थ्यांचे सभाधीटपणा व इंग्रजीवरील प्रभत्व पाहून प्रमोद चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.
शाळेतील विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून शाळेत नियमित राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे माहितीपटाद्वारे व्हिडीओचे सादरीकरण प्र.मुख्याध्यापक सुभाष येवले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीतल पवार,सुनीता देवराव,वैशाली डफळ,प्रिया अहिरे,शबाना पठाण, विश्वास कदम आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments