श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव
श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने दि.१५ रोजी महाप्रसादवेब टीम नगर,८ - श्री मार्कंडेय महामुनी चौक, गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने शनिवार दि.१५फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७. ३० वाजता मार्कंडेय मंदिर येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सावानिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारप यांनी दिली.
श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दि. ५ते १५ फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८वाजेपर्यंत मुकूंद पारनाईक महाराज यांचे श्री गजानन महराज भक्त विजय ग्रंथ प्रवचन होणार आहे. तरी सर्वांनी या श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मार्कंडेय मंदिर देवस्थानच्यावतीने करण्यात आले.
महाप्रसाद हा सार्वजनिक भंडारा असून त्यासाठी लागणारे साहित्य हे वस्तुस्वरुपात स्विकारले जाईल. तसेच देणगी ही स्विकारली जाईल. अधिक माहिसाठी ९८९०१००८७९, ९८६०३४५६५९ या क्रमांकावर संपर्क साधावा
0 Comments