सेवानिवृत्तीनंतर आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करावे

सेवानिवृत्तीनंतर आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करावे

अब्दुस सलाम - मातोश्री उर्दू हायस्कूलच्या शेख शहेनाज सिराज सेवानिवृत्त
वेब टीम नगर,दि. ६ - सेवानिवृत्ती ही नोकरीतून होत असली तरी सेवानिवृत्तीनंतरचे नवीन जीवनात प्रवेश म्हणावा लागेल. नोकरी-कामधंद्यानिमित्त  कौटूंबिक जबाबदारीमुळे प्रत्येकाच्या काहीनाकाही अपेक्षा, छंद हे अपूर्ण राहत असतात. सेवानिवृत्तीनंतर नोकरीतील तसेच कौटूंबिक जबाबदार्यांही व्यवस्थीत पार पाडल्यानंतर आता स्वत:साठी,समाजासाठी वेळ दिला पाहिजे. आपणास आवडत्या क्षेत्रात काम करुन आपले जीवन
परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. शेख शहेनाज सिराज यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणे सेवा करुन शिक्षणासारख्या पवित्र कार्यास हातभार लावला आहे.त्यांचे पुढील आयुष्य आनंदी जावो, अशा शुभेच्छा मोहंमदीया एज्युकेश सोसायटीचेसंस्थापक अब्दुस समाल  यांनी दिल्या.
     अलफला एज्युकेशन अॅ ण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मातोश्री उर्दू हायस्कूल,आलमगीर येथील शिक्षिका शेख शहेनाज सिराज यांचा सेवानिवृत्तीबद्दल संस्थेच्यावतीने प्रा.अब्दुस सलाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मुख्याध्यापक जमिर शेख, ख्वाजा , शबाना आपा, फरिदा भाभी, अफसाना शेख आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments