पालकांनीच मोबाईल, टीव्ही पासून दूर रहावे


पालकानीच मोबाईल, टीव्ही पासून दूर रहावे 

दत्ता दिकोंडा - स्माईली किडस् नर्सरी स्कूलचे स्नेहसंमेलन 
 वेब टीम नगर, दि. ६- रंग दे बसंती... मल्हार वारी... हवा हवाई अशा विविध गीतांवर आणि सामाजिक संदेश देणार्याट बेटी बचाओ..बेटी पढाओ..., वृक्षसंवर्धन जनजागृती करणार्या. विविध गीतांवर बालचमुंनी नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक गाण्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात साथ दिली. निमित्त होते बालिकाश्रम रोडवरील स्माईली किडस् प्ले ग्रुप व नर्सरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे.
     कार्यक्रमाचे सुरुवात  योग पंडीत दत्ताजी दिकोंडा यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, पी.एन.डफळ, राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्य.सदस्य शिवाजीराव नाईकवाडी, सुप्रिया मैड, राजू म्याना आदि उपस्थित होते.
     याप्रसंगी दत्ता दिकोंडा म्हणाले, लहान मुले ही निरिक्षकातून शिकत असतात, त्यामुळे पालकांनी स्वत: मोबाईल, टी.व्ही. यापासून दूर राहून मुलांना पुस्तक वाचनाची गोडी लावावी. त्यांच्यातील कला-गुण पाहून त्या क्षेत्राशी संबंधित गोष्टी आणून देऊन त्यास प्रोत्साहन द्यावे. स्कूलच्यावतीने चांगले उपक्रम राबविले जात आहेत. यामुले मुलांची सर्वांगिण वाढ होण्यास मोठी मदत होईल, असे ते म्हणाले.
     याप्रसंगी नगरसेविका पुष्पाताई बोरुडे म्हणाल्या, साने गुरुजींच्या विचारांचा वारसा या स्कूलच्या माध्यमातून पुढे चालविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी हा सक्षम व सुदृढ बनण्यास नक्कीच मदत होईल.
     स्मिता आहेर यांनी पालकांच्यावतीने मनोगतात सांगितले की, शाळेच्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये झालेले चांगले सकारात्मक बदल मुलांना प्रोत्साहन देणारे आहेत.
     संचालिका स्मिता म्याना यांनी स्कूलच्यावतीने वर्षभर राबविण्यात येत असलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये दिंडी, बाहुला-बाहुलीचे लग्न, विविध राष्ट्रीय सण, उत्सव, राष्ट्र पुरुषांच्या जयंती तसेच मुलांमध्ये स्टेज डेअरिंग, सूर्यनमस्कार, व्यायाम आदि उपक्रम राबविले जातात. मुलांचा दर्जेदार शिक्षण देण्याचा स्कूलच्यावतीने प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी मैड व रसिका म्याना यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहित म्याना, शिक्षिका प्रियंका देवतरसे, सुप्रिया गाडेकर, मिनाक्षी मोरे, कविता कोकणे, रेणुका पठारे आदिंनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते. मुलांना विविध बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

Post a Comment

0 Comments