रक्त मानव निर्मित नसल्याने रक्तदानाची गरज
डॉ.पारस कोठारी -भाईसथ्था नाईट हायस्कूलमध्ये ३१वे रक्तदान शिबीरवेब टीम नगर,दि. ६ -रक्त हे कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वैज्ञानिक प्रगती केली परंतु रक्ताची निर्मिती करू शकला नाही .त्यामूळे प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे.रक्तदान केल्याने जीवनदान मिळते.अपघाताचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता रक्ताचा तुडवडा जाणवतो.यासाठी प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी रक्तदान करावे असे प्रतिपादन भाईसथ्था नाईट हायस्कूलचे अध्यक्ष डॉ.पारस कोठारी यांनी केले.
हिंदसेवा मंडळाच्या ज्युनिअर कॉलेज,भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये ३१वे रक्तदान शिबीर प्रसंगी डॉ.पारस कोठारी बोलत होते.यावेळी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा,माजी मानद सचिव सुनील रामदासी,अजित रेखी,नीलकंठ देशमुख,एल जी.गायकवाड,दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुदगल,प्राचार्य सुनिल सुसरे, शालेय समिती सदस्या अलकाताई मुळे,ज्योती कोठारी,जेष्ठ शिक्षक देवीदास खामकर,गजेंद्र गाडगीळ,महादेव राऊत,संदेश पिपाडा,प्रशांत शिंदे,मंगेश भुते,अशोक शिंदे,करांडे ,गोर्डे ,शिवप्रसाद शिंदे,अनिरुद्ध देशमुख,सुजय रामदासी, अविनाश गवळी,कैलास बालटे,मनोज कोंढेजकर,वैशाली दुराफे,साठे ,वाणी ,भोसले , साताळकर,जाधोर आदींसह विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
अजित बोरा म्हणाले कि,भाईसथ्था नाईट हायस्कूलने ३१ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबीर घेत आहेत.सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबीर घेण्यात येते.हि कौतुकास्पद बाब मानले. आहे.
सुनील रामदासी म्हणाले कि,रात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे रक्तदान केलेआहे.या शिबिरात शिक्षकही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात हि अभिमानास्पद बाब आहे. रक्तदान शिबिरात रक्तसंकलनाचे कार्य जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने करण्यातआले.सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. प्रास्तविक भाईसथ्था नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.शरद पवार यांनी केले ,आभार अमोल कदम यांनी मानले.
0 Comments