रायसोनी मधून इन्फोसिस मध्ये ३२ जणांची निवड
वेब टीम नगर ,दि . ५-चास, येथील जी. एच रायसोनी महाविद्यालयात दि. ३ व ४ फेब्रुवारी २०२० रोजी इंजिनीरिंगच्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिसद्वारे कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले. हा ड्राइव्ह अहमदनगर जिल्ह्यातील इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. यासाठी रायसोनीसह नगर शहर, कोपरगाव, संगमनेर, लोणी येथील ४५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. दि. ३ फेब्रुवारी २०२० रोजी सर्वप्रथम नोंदणीकृत विद्यार्थ्यांची दीड तासांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली आणि त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या ४२ विद्यार्थ्यांची मुलाखत दि. ४ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आली. त्यापैकी ३२ जणांची अंतिम निवड कंपनीद्वारे करण्यात आली. यामध्ये रायसोनी महाविद्यालयाची कॉम्पुटर इंजिनीरिंग शाखेची विद्यार्थिनी संपदा सुनील चुंबळकर हिची निवड झाली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयकुमार जयरामन यांनी अभिनंदन केले व या ड्राइव्हसाठी इन्फोसिसकंपनीने सर्वप्रथम रायसोनी कॉलेजला प्राधान्य दिले याबद्दल संस्थेकडून कंपनीचे आभार मानले.
या ड्राइव्हच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयकुमार जयरामन, ट्रैनिंग आणि प्लेसमेंट सेलचे सचिन उमरे, सुदर्शन दिवटे, प्रा. अनिकेत जोशी यांनी परिश्रम घेतले व अनिल भोर,संदीप चौरे यांचे सहकार्य लाभले.
0 Comments