दि.१५ पासून महाशिविरात्री निमित्त फुलसौंदर मळा 

येथे हरिनाम सप्ताह सोहळा

 वेब टीम  नगर,दि. १२ - बुरुडगांव रोड, फुलसौंदर मळा शिवपंचायत मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्रीनिमित्त सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री उत्सवाचे हे २० वर्ष असून, या वर्षी शनिवार दि.१५ ते २२ फेब्रुवारी २०२० या सप्ताहामध्ये पहाटे ४ ते ६काकड आरती, स. ८ ते ९ विष्णू सहस्त्रनाम, स. ९ ते १२ ज्ञानेश्‍वरी पारायण होईल.

     या सोहळ्यात शनिवार दि.१५ रोजी हभप भगवताचार्य लक्ष्मीबाई खडके महाराज (वृंदावन) चिचोंडी पाटील. दि. १६ रोजी हभप बबन महाराज बहिरवाल, मदन महाराज संस्थांन, कडा जि.बीड. दि. १७ रोजी हभप हरिदास महाराज पालवे शास्त्री, देवाची आळंदी. दि. १८ रोजी हभप योगीराज महाराज पवार, आळंदी देवाची, दि. १९  हभप भागवताचार्य ज्ञानेश्‍वर माऊली महाराज, कापुरवाडी. दि.२० रोजी हभप पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री, ज्ञानेश योग आश्रम संस्थान, डोंगरगण, दि. २१ रोजी हभप महेश महाराज मडके, नेवासा यांचे किर्तन होईल.  दि. २२ रोजी हभप रामायणाचार्य यशवंत महाराज थोरात, ढवळपुरी यांचे काल्याचे किर्तन होऊन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

     महाशिवरात्रीच्या दिवशी सामुदायिक अभिषेक सोहळा स. ७.३० वा. आणि दु. २ वा. शिवरात्री विशेष कार्यक्रम रेखाताई झंवर आयोजित पार्थी व शिवलिंग पूजन होईल. या कार्यक्रमास शिवसेना उपनेते अनिल राठोड, माजी महापौर सुरेखाताई कदम उपस्थित राहणार आहेत.

     तरी यासर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, विष्णू फुलसौंदर, दिलीप माडगे, राजू फुलसौंदर, भास्कर गायकवाड, अनिल साळूंके, नन्नवरे, सिताराम तागड यांनी केले आहे . 

Post a Comment

0 Comments