नूतन ग्रामपंचायत सदस्य कुमारभाऊ लोखंडे यांचा सत्कार

नूतन ग्रामपंचायत सदस्य कुमारभाऊ लोखंडे यांचा सत्कार

    वेब टीम  नगर,दि. १० - नगर तालुक्यातील शहापूर-केकती ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सैनिकनगर प्रभाग क्र. 2 मधून कुमारभाऊ लोखंडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल विविध सामाजिक संस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  निलेश म्हसे. समवेत अक्षय उमाप, नाना घडसिंग, नितीन थोरात, लखन नन्नवरे, सुरज उमाप, निलेश शिंदे, बंटी लोट, शफीक मुगल, प्रविण वाघमारे, प्रमोद साळवे, राहुल चौरे, अजय थोरात आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी कुमारभाऊ लोखंडे म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपत सामजातील युवकांसाठी विविध योजना व उपक्रम पदाच्या माध्यमातून राबवू.तसेच एकमेकांमधील मतभेद दूर करुन गावाच्या विकासात योगदान देऊ. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. गावाचा विकास हेच ध्येय ठेवून आपण काम करणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर सांगितले.

     यावेळी समर्थकांनी फटाक्याचे अतिषबाजी करत, ढोल - ताशांच्या गजरात पेढी वाटले. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments