जामिया मिलिया विद्यापीठाच्या पाच नंबर गेटवर गोळीबार


जामिया मिलिया विद्यापीठाच्या पाच नंबर गेटवर गोळीबार 

वेब टीम दिल्ली ,दि. ३-जामिया मिलिया येथे सुरू असलेल्या एसीसी कायद्या विरोधातील आंदोलनात आज तिसऱ्यांदा गोळीबार झाला हा गोळीबार पाच नंबर गेटवर करण्यात आला मात्र पोलिसांना तेथे गोळीबार झाल्याचा कुठलाही पुरावा आढळला नाही नागरिकांच्या सांगण्यावरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे .गेल्या काही दिवसात तिसऱ्यांदा गोळीबार करण्यात आल्यावरही पोलिसांच्या हातात मात्र कुठलाच पुरावा सापडलेला नसल्याचे निदर्शनास आले  आहे .या घटनेमुळे दिल्लीतील वातावरण तापले असून  दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावरही  परिणाम झाला आहे .

Post a Comment

0 Comments