गोंधळी समाजाच्या प्रश्नासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करू




गोंधळी समाजाच्या प्रश्नासाठी   मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करू 

आ. संग्राम जगताप -हिंदवी रेणुराई गोंधळी समाज राज्यस्तरीय  कला संमेलन  

     वेब टीम नगर,दि.२- माणूस कितीही मोठा झाला, अधिकारी झाला , उद्योगपती झाला , व्यापारी झाला कलाकार झाला  तरी धर्म आणि संस्कार कधीही बदलू शकत नाही गोंधळी समाजाचे समाज मंदिर आपली संस्कृती विचार जपण्यासाठी आवश्यक आहे . या समाज मंदिराच्या माध्यमातून एक चांगला विचार गोंधळी समाजाला मिळेल . असा विश्वास आ . संग्राम जगताप यांनी व्यक्त केला . यापुढील काळात गोंधळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण समाज कल्याण मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून समाजाला लाभ मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले .
हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटना , अहमदनगर , महाराष्ट्र राज्य चे रौप्यमहोत्सवी अधिववेशन आणि राज्यस्तरीय गोंधळी समाज कला संमेलन उत्साहात पार पडले . या निमित्त आ . संग्राम जगताप यांच्या स्थानिक आमदार निधीतून गोंधळी समाजाचे रेणुकामाता सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले आहे .  रेणुका माता संस्कृती सभागृह , भगवान परशुराम तीर्थ ,नानाजी नगर परिसर  येथे नव्याने बांधण्यात आले आहे. याचे उदघाटन आ . संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते .
  प्रमुख पाहून म्हणून  नगरसेवक निखिल वारे , बाळासाहेब पवार , सुनील त्रिम्बके , बाबासाहेब गाडळकर  , सारंग पंधाडे , दिलदारसिंग बीर, औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी  सांस्कृतिक  सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा . ज्ञानदेव शिंदे ,  बालाजी धुमाळ , वंदनाताई ओगले , अरुणाताई धुमाळ , हरिदास उगले , बबनराव सूर्यवंशी,  जालना येथील नायब तहसील दार  प्रल्हाद उगले ,  नगर जिल्हा परिषद समाज कल्याण  अधिकारी नितीन उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते .
              प्रास्ताविकात दशरथ धुमाळ म्हणाले की , गोंधळी  समाजाचे सभागृह उभे राहिले .त्यामुळे समाजाला त्यांच्यामुळे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. अशी गोंधळी समाजाची वास्तू राज्यात एकमेव आहे. या ठिकाणी गोंधळी समाज कला प्रशिक्षण केंद्र तर आम्ही चालविणारच आहोत त्यासोबत समाजातील गुणी मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी चालविण्यात येणार आहे. एस टी आणि एस सी प्रवर्गासाठी निधी भरपूर उपलब्ध आहे . पण भटक्या विमुक्त समाजासाठी भरीव अशा निधीची तरतूद नाही . योजना तुटपुंजा आहेत . जिल्हापरिषद कलावंतासाठी जो निधी उपलब्ध आहे तो फक्त हाताच्या बोटावर मोजणाऱ्या कलाकारांना मिळतो . शासन स्तरावर यासाठी आपल्या गोंधळी समाजाला पाठपुरावा करणे गरजेचे आहे.                          हिंदवी रेणुराई  गोंधळी समाजाच्या राज्यस्तरीय कला संमेलनाची  सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य अशा शोभायात्रेने झाली . त्यानंतर संमेलनाचे उदघाटन दीप प्रज्वलन करून झाले . उपस्थित मान्यवरांचा संयोजक दशरथ धुमाळ , गणेश जाधव , विजय गरडसर , विकास जाधव , गोरख उबाळे, शिवाजीराव थिटे, भारत धुमाळ, मारुती दुनगु, पांडुरंग ढवळे , कैलास उबाळे , कचरू गोंधळी यांनी केला ,  समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाज बांधवाना जीवन गौरव आणि समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष धुमाळ , संतोष अटक , अनिल धुमाळ यांनी केले .  उदघाटन समारंभानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जागरण गोंधळ कलाकारांनी या कला संमेलनात रात्रभर आपली कला सादर करून रात्र जागून काढली .

Post a Comment

0 Comments