ईशान्य दिल्लीत एक महिन्यासाठी जमावबंदी
CAA विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने निर्णयवेब टीम दिल्ली ,दि. २९-ईशान्य दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. १४४ हे जमावबंदीचं कलम असून पुढच्या महिन्याभरासाठी ईशान्य दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ईशान्य दिल्लीत CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर आजही हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. दोन गटांमध्ये जोरदार दगडफेकही झाली. त्यानंतर कलम १४४ अर्थात जमावबंदीचं कलम दिल्लीमध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिन्याभरासाठी ही जमावबंदी असणार आहे.
दिल्लीत काही वेळापूर्वीच दोन गटांमध्ये दगडफेक सुरु झाली. CAA, NRC ला विरोध करण्यासाठी सुरु असलेला गदारोळ दुसऱ्या दिवशी काही काळासाठी शमला होता. मात्र पुन्हा एकदा दोन गटांमध्ये दगडफेक सुरु झाली. त्यामुळे ईशान्य दिल्लीत जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
आंदोलनात उसळलेल्या हिंसाचारामुळे आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडले. आग नियंत्रणात आणण्यासाठी जे अग्निशमन दलाचे बंब आले त्यावरही दगडफेक करण्यात आली.
0 Comments