चंद्रपूरमध्ये दारू बंदी साठी समीक्षा समिती ?


चंद्रपूरमध्ये दारू बंदी साठी समीक्षा समिती ? 

वेब टीम चंद्रपूर,दि. २८-  मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी हटवण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, त्यावर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दारुबंदी हटवण्याचा असा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र यानंतरही चंद्रपूरचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या स्तरावर जिल्ह्यातील दारुबंदी हटवण्यावर विचार करण्यासाठी समीक्षा समितीची नेमणूक केली. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. पालकमंत्री आणि प्रशासन चंद्रपूरमध्ये दारुबंदीची समीक्षा करत आहे की दारुचं मार्केटींगची  मोहीम करत आहे, असा थेट सवाल डॉ. अभय बंग यांनी विचारला आहे.
डॉ. अभय बंग म्हणाले, “पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारुबंदी अंमलबजावणीची समीक्षा करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समीक्षा समिती नेमली. मात्र, चंद्रपूरच्या उत्पादन-शुल्क विभागाने समीक्षा करण्याऐवजी मंगळवारी (२५ फेब्रुवारी) माध्यमांसमोर चंद्रपूरमधील २ लाख  ६२ हजार लोकांना दारुबंदी नको असल्याचं जाहीर केलं. समीक्षा म्हणजे मूल्यमापन. पण या समितीने दारुबंदीचं मूल्यमापन केलंच नसताना उत्पादनशुल्क विभागाने निवडणुकीच्या मतमोजणीपेक्षाही अधिक गतीने हा निकाल जाहीर केला. संबंधित अधिकाऱ्यांनी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर केवळ २ तासात २,८२,००० अर्जांची मोजणी केली आणि २,६२,००० लोक दारुबंदी हटवण्याची मागणी करत असल्याचं जाहीर केलं.”

Post a Comment

0 Comments