रतनबेन कुरवा यांचे स्मरणार्थ निसर्गसृष्टीला ७८०० रुपयांची देणगी
वेब टीम नगर,दि. २७ - मरणोत्तर नेत्रदान आणि गो-शाळेला मदत करतांना शाह परिवाराने समाजासमोर एक आदर्श उभा केला असल्याचे प्रतिपादन जैन समाजाचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले.स्व.रतनबेन हिरालाल कुरवा यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर प्रार्थना सभेत नातेवाईक, परिवाराने गो-शाळेसाठी अवघ्या दहा मिनिटात ७८२१ रुपयांची मदत गोळा केली. ती सुभाष मुथा यांच्या हस्ते आणि विश्वस्त मणिकांत भाटे, सुधीर मेहता आणि शाह परिवाराच्या उपस्थितीत निसर्गसृष्टी गोपालन संस्थेला देण्यात आली. यावेळी सुशिल शाह, प्रिती शाह (कुरवा), यश शाह, प्रणय शाह, अदिती शाह, गो शाळेचे गौतम कराळे, विष्णू कुलकर्णी, निर्मला लालका, आदि उपस्थित होते.
सुभाष मुथा यांनी यावेळी स्व.रतनबेन कुरवा यांना आदरांजली वाहतांना श्रीमती कुरवा या अतिशय धार्मिक होत्या, त्यांनी चारही मुलींवर अतिशय चांगले संस्कार केले आहेत. त्यामुळेच त्यांची कन्या सौ.प्रिती शाह यांनी नुकतेच अतिशय खडतर असे सिद्धीतप केल्याचे ते म्हणाले. कुरवा परिवाराचा आदर्श घेऊन सर्वांनी सुख-दुखात, गो-शाळेला मदत करावी,असे आवाहन करुन मुले-मुली, वडिलांची सेवा करतांना स्व.हिरालालजी कुरवा यांच्या योगदानाची सुभाष मुथा यांनी माहिती दिली.
सुधीर मेहता यांनी निसर्गसृष्टी गोपालन संस्थेची महिती देतांना त्यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगून या संस्थेवर जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन जैन समाजाला केले. मणिकांत भाटे यांनीही गोगालेचे कौतुक केले.
प्रिती शाह यांनी सर्वांना धन्यवाद देऊन आई-वडिल, सासू-सासरे यांच्या स्मृतीदिनी दरवर्षी निसर्गसृष्टी गो-शाळेला देणगी देणार असल्याचे सांगितले.
0 Comments