सोमवारी शहर सलून असो.ची महत्वपूर्ण विषयांवर सर्वसाधारण सभा


सोमवारी शहर सलून असो.ची महत्वपूर्ण विषयांवर सर्वसाधारण सभा

    वेब टीम  नगर,दि.२७ - अहमदनगर शहर सलून असोसिएशनची सर्वसाधारण सभा सोमवार दि.२ फेब्रुवारी  रोजी दु. ४ वा. लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालय, टिळकरोड, नगर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेत सागर औटी, महेश मोरे, मनेष शिंदे, बंडू बिडवे, संग्राम निकम आदि मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस बाळासाहेब भुजबळ, शांताराम राऊत, रामदास आहेर आदि उपस्थित राहणार आहेत.
     या सभेत नूतन पदाधिकार्‍यांची निवड करणे, नवीन समान दरवाढ लागू करणे, चर्चासत्रांचे आयोजन व  विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. तरी या सर्वसाधारण सभेस सलून व्यवसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अनिल निकम यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments