दत्ता भंडार यांना स्वातंत्र्यसेनानी डॉ.एस.टी. महाले, तर विवेक पवार यांना क्रीडामहर्षी किसन आरकल स्फूर्ती पुरस्कार जाहीर
पुरस्काराचे स्वरूप : मानपत्र, मानचिन्ह, पुस्तके व रोख रक्कम
वेब टीम नगर ,दि. २६- विचारधारा, जिज्ञासा अकादमी आणि मातृ याच बरोबर साने गुरुजी शिक्षण संस्था, आवाबेन नवरचना केंद्र व संस्था, आपले घर , समाजवादी महिला सभा, साधना प्रकाशन, हडपसर साहित्य व संस्कृती मंडळ, संघटना राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्तपणे देण्यात येणारा “स्वातंत्र्यसेनानी डॉ.एस.टी.महाले स्मृती पुरस्कार” पुणे येथील पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता भंडार यांना तर अहमदनगरच्या विवेक पवार यांना क्रीडामहर्षी किसनराव आरकल स्मृती पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाष वारे व विचारधाराचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल अंभी बुलबुले यांनी दिली.
विचारधारा व जिज्ञासा अकादमी या संस्थेच्या माध्यमातून १९९८ पासून “स्वातंत्र्यसेनानी डॉ.एस.टी. महाले स्मृती पुरस्कार” दिला जातो. तर क्रीडामहर्षी किसनराव आरकल स्फूर्ती पुरस्कार मागील तीन वर्षापासून सुरु करण्यात आला आहे.
एस.एम.जोशी फाउंडेशन पुणे येथे निवड समितीचे अध्यक्ष, राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व एस.एम जोशी फॉन्डेशनचे सचिव, प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत निवड समितीचे सदस्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, (धुळे) छात्रभारतीच्या प्रा.बिना सावंत (अकोले) डॉ.उदय महाले (अहमदनगर) व्यंकटेश आरकल, युनुस तांबटकर (पुणे) व निवड समितीचे निमंत्रक प्रा. विठ्ठल बुलबुले हे उपस्थित होते. पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांची नावे सुचविण्यात आली होती. त्या नावातून पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली.
पुरस्कारार्थी दत्ता भंडार यांचा परिचय-
लहानपणापासून राष्ट्र सेवा दलात सक्रिय आहेत. हालाखीची परस्थिती असतानाही इंजिनियर पर्यंत शिक्षण घेऊन ते पुण्यात किर्लोस्कर कंपनीमध्ये नोकरीला लागले. त्याच वेळी राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय पातळीवर ते कार्य करीत होते व आजही कार्य सुरु आहे. शिक्षण, आरोग्य, सहकार व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्था संघटनांच्या मार्फत गेली ४५ वर्ष कार्यरत.
१९७२ बालकुमार मेळावा, १९७४,हडपसर मेळावा व १९९१ चा सुवर्ण महोत्सव मेळावा या मेळाव्याचे नियोजन आयोजनात व यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा होता यात निधी संकलन व कार्यक्रम आखणीत भरीव योगदान दिले. पुणे जिल्हा कार्यध्यक्ष, राज्य व केंद्रीय कार्यकारणी सदस्य, विभागीय संघटक, राज्याचे अभ्यास मंडळ प्रमुख, घटना दुरुस्ती समीतिचे सदस्य असे अनेक पदे त्यांनी संघटनेत भूषविले व कामाचा ठसा उमटवला.
किर्लोस्कर फौंडेशनचे सल्लागार म्हणून कार्य असे अनेक संस्थांवर पदाधिकारी म्हणून योगदान.
आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास होतकरू विद्यार्थ्यांना १० वी, पर्यंत शिकताना संपूर्ण शैक्षणिक मदत केले जाते, ८८ मुलामुलींची जबाबदारी त्यांनी व त्यांची लेक व जावई आणि सहकाऱ्यांनी घेतली आहे त्याना संगणक शिक्षणही दिले जाते, अवघड विषयांचा स्वतंत्र अभ्यास घेतला जातो, त्यासाठी प्रशस्त व आधुनिक सोयीसुविधा असलेले सभागृह हडपसरच्या बेकराई भागात बांधण्यात आले.
५ शाळा व ३५ विद्यार्थ्यांना घेऊन २००९ साली सुरू झालेला हा प्रकल्प आज ८ शाळा व ८८ विध्यार्थी पर्यंत पोहचला.या प्रकल्पाचा खर्च भंडार पटनाईक परिवाराकडून केला जातो.
पुरस्कारार्थी विवेक पवार यांचा परिचय –
१९७० पासून सेवालाचे कार्य,राष्ट्रीय खेळाडू नंदकुमार व विवेक दोघे सेवादलाचे सैनिक.
मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढयात दिवंगत एस एम जोशी यांच्या अहवानाला प्रतिसाद देत मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात कार्य, क्रीडामहर्षी किसनराव आरकल, डॉ महाले यांचा सहवास व नेतृत्वाखाली कार्य, नाट्यक्षेत्रात जागर मंचच्या माध्यमातून कार्य त्यात अनेक पारितोषिके मिळाली. सेवादल सैनिक ते जिल्हा शहर कार्याध्यक्ष पदावर कार्य जवळजपास १० वर्ष शहराचे कार्यध्यक्ष म्हणून कार्य या कालावधीत सेवादलाची शिबिरे, पथनाट्य, विविध स्पर्धा, दांडिया, चर्चासत्रे, व्याख्याने,आयोजित केली. मोफत शिक्षण हक्क आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन , आयोडिन युक्त मीठ सक्ती विरोधी आंदोल, छात्रभारती विध्यार्थी आंदोलन, आदी आंदोलनात सहभाग होता डॉ बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंती निमित्त व्याख्यानमाला आयोजनात अग्रेसर होते.
थोरले बंधू नगरसेवक नंदकुमार पवार यांच्या मार्फत समाजवादी नेते प.पू रावसाहेब पटवर्धन स्मारकाच्या अनेक कामाणसाठी पुढाकार घेतला. झी टीव्ही व राष्ट्र सेवा दल आयोजित२५००० प्रेक्षकांचा सहभाग असलेल्या लिटिल चाम्स कार्यक्रम आयोजित करण्यात मोठा सहभाग.
अच्युतराव पटवर्धन जन्म शताब्दी निमित्त आयोजित सर्वोदय संमेलन आयोजनात पद्मश्री पोपट पवार यांच्यासोबत सहसचिव म्हणून कार्य जिल्हा बँकेच्या क्लार्क ते जनरल मॅनेजर या पदावर कार्य व मायबाप शेतकऱ्यांना प्रामाणिक सेवा देण्याची कारकीर्द आहे.
सानेगुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांसारखे सतत उपक्रमशील राहणे हा दोन्ही पुरस्कारार्थींचा स्वभाव असल्याने. त्यांच्या धडपडीने समताधिष्टीत समाज व संविधानी समाज निर्मितीच्या दिशेने काही पाऊले पडले आहेत हे निश्चित असे विचारधारेला वाटते
0 Comments