पंचमदा फॅन्स फौंडेशनची अविस्मरणीय ‘द लिजंडस् ’ संगित संध्या उत्साहात


पंचमदा फॅन्स फौंडेशनची अविस्मरणीय

‘द लिजंडस् ’ संगित संध्या उत्साहात 


    वेब टीम नगर,दि. २६ -  प्रसिद्ध  पंचमदा फॅन्स फौंडेशनच्या वतीने आयोजित ‘ द लिजडंस्’ हा जुन्या गीतांचा बहारदार कार्यक्रम नुकताच माऊली सभागृह येथे  झाला. प्रथमच रफी, किशोर, मुकेश, महेंद्र कपुर, मन्नाडे, लता, आशा अशा दिग्गज गायकांची श्रवणीय गीते सादर करण्यात आली.
     संगित रसिकांची आवड लक्षात घेऊन प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन देण्याचा पंचमदा फॅन्स फौंडेशनचा मानस असतो. याची प्रचिती या कार्यक्रमात आली गायक संदिप भुसे यांच्या ‘ ख्वाब हो तुम या कोई...’ या किशोर कुमार यांच्या गीताने कार्यक्रमाची छान सुरुवात झाली. पोलिस निरीक्षक असिफ शेख यांनी  ‘ है दुनिया उसीकी लागा चुनरीमे दाग, पर्दा है पर्दा’ ही गाणी सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. मुंबईच्या गायिका वैभवी कदम यांनी रोज शाम आती है, उनसे मिली नज़र, छोड दो आँचल ही गीते सादर केली. वाजीद खान  यांनी अपनी आंखोमें बसाकर, तुम अगर साथ देने का, लाखों है निगाह में, अशी बहारदार गाणी सादर केली. डॉ.सत्तार सय्यद यांनी ये जो चिलमन है, तुम जो मिल गये हो, मस्त बहारों का आशिक ही गीते सादर केली. अभय कांकरीया यांनी मुकेश यांच्या आठवणी जागवत ‘कही दुर जब मेरा प्यार ही तु, एक प्यार का नगमा, डम डम डिगा डिगा अशी श्रवणीय गीते सादर केली. अहमदनगर मध्ये प्रथमच आलेल्या पार्श्‍वगायिका संगिता भावसार यांची ना जीया लागे ना, मेघा छाये दिल चिज क्या है, अशी शास्त्रीय संगिता वर आधारीत गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली. संदिप भुसे यांनी दिल ऐसा किसीने, झुमरु, गाता रहे मेरा दिल, अशी धमाल गाणी सादर केली. बाल कलाकार ओम कांकरिया याने आ लोट के आजा मेरे मित हे गी अतिशय, प्रभावी सादर केले. रसिकांची वाहवा मिळविली. ह्या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
     दिलावर शेख, अजय साळवे, अजित गुंदेचा, ललित भुमकर, अमोल कनगरे, संजय आठवले, हार्दिक रॉवल, मनोज गुरव, फरहान शेख, अरुण वाघमारे यांनी संगिताची भक्कम बाजु संभाळली. उस्मान पहणी यांची निवेदकाची भुमिका दाद घेवुन गेली. शांती ऑडीओ चे राजु ढोरे यांची ध्वनी व प्रकाश व्यवस्था संभाळली.
     या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षकांबरोबरच पोलीस उपअधिक्षक श्री. संदिप मिटके, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक पराग नवलकर यांनी लुटला.

Post a Comment

0 Comments