भारत अमेरिका संबंधातील बर्फ नव्वदीच्या दशकातच वितळला -ट्रम्प

भारत अमेरिका संबंधातील बर्फ

 नव्वदीच्या दशकातच वितळला -डोनाल्ड ट्रम्प 

वेब टीम अहमदाबाद ,दि. २४ - अमेरिका भारत याम्च्याआतील संबंधाना ९० च्य दशकात सुरवात झाली.आज आपण खूप चांगल्या संबंधाच्या उंबरठ्यावर उभे असून भारत अमेरिका हे चागले नैसर्गिक मित्र म्हणून भविष्यात नावारूपाला येतील असा आशावादही ट्रम्प यांनी व्यक्त केला . यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विविध योजनांचे तोंडभरून कौतुक केले.
इसिसच्या संस्थापकांचा मी खात्मा केला असा उल्लेखकरुन भारत आणिअमेरिका या दोघांनाही इस्लामी दहशतवादाचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी  नमूद करून पाकिस्तानने दहशतवादी  संघटनांचा  बिमोड करण्याचे आवाहनही केले. भारता बरोबर ३ अब्ज लाख डॉलरचा शस्त्रास्त्र विक्रीचा करार करणारा असल्याचे ट्रम्प यांनी  जाहीर केले .
ट्रम्प यांनी  आपल्या भाषणात बॉलीवूड ,सचिन तेंडुलकर ,विराट कोहली ,यांचा आवर्जून उल्लेख केला.सुरवातीला ट्रम्प यांनी नमस्ते इंडिया अशी सुरवात करताच उपस्तितांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला . मोटेरा हे अतिशय भव्य स्टेडियम असल्याचेही ट्रम्प म्हणाले.   

Post a Comment

0 Comments