मैदानी खेळाला महत्व दिल्याने यशाची परंपरा कायम



  मैदानी खेळाला महत्व दिल्याने यशाची परंपरा कायम  

सविता सानप -डॉ.पाउलबुधे अध्यापक विद्यालयाचे जिल्हा स्पर्धेत सुयश
    वेब टीम  नगर,दि. १९ - विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासासाठी प्रवृत्त न करता त्यांना मैदानी खेळाकडे लक्ष देण्यासाठी पालकांनी भाग पाडावे. डॉ.ना.ज.पाउलबुधे शैक्षणिक संकुलात आमच्या कला, क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांना महत्व दिल्याने अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे, असे प्रतिपादन प्राचार्या सविता सानप यांनी केले.
     जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर व अभिनव शिक्षण संस्था अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतरअध्यापक विद्यालय कला व क्रीडा स्पर्धेमध्ये डॉ.ना.ज.पाउलबुधे अध्यापक विद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय  आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्या सानप बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे मधुकर नवले, प्राचार्या अचला जडे, सांख्यकि सहाय्यक टिळेकर, सूर्यवंशी,  मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.
     प्राचार्या सानप पुढे म्हणाल्या, आमच्या महाविद्यालयामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी शाळेत विविध स्पर्धा घेऊन त्यामधून चांगले विद्यार्थी घडविले. जिल्हास्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या यशावरुन हे सिद्ध होते. केवळ अभ्यासासाठी त्यांच्यावर दबाव न ठेवता तर मैदानी खेळासाठी त्यांना पालकांनी प्रोत्साहन द्यावे, असे त्या म्हणाल्या.
जिल्हास्तरीय स्पर्धेत योगिता पवार हिने पोस्टर स्पर्धेत द्वितीय, गोळाफेक स्पर्धेत बापूसाहेब घोरपडे या विद्यार्थ्यांने प्रथम तर मुलींमध्ये माधुरी गवळी हिने पहिला क्रमांक पटकाविला. समुहगीत स्पर्धेत स्वाती सूर्यपुजारी, रागिणी डिंगरे, मेघा बॅनबेस, माधुरी गवळी, भक्ती काळे, जान्हवी फुलपगार, सरोज वर्मा, काजल वावरे, अलिशा ताकवाले, प्रांजल गीते, तबला वादक प्रभाकर सूर्यपुजारी आदिंनी सहभाग घेतला होता. निबंध स्पर्धेत कमल सातपुते, अश्‍विनी पवार यांनी बक्षिसे मिळविली.  तर धावणे स्पर्धेत हर्षदा गायकवाड, अमोल जाधव यांनी व थाळीफेकमध्ये वैभव माने यांनी सहभाग घेतला होता.
     यासर्व विजेत्या स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे व संस्थेचे पदाधिकारी तसेच डीएलएड कॉलेजच्या प्राचार्या सविता सानप, बी.एड्. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, प्रा.एम.एस.डिमळे, प्रा.एस.बी.येमुल, प्रा.ए.आर. बडे, एस.पी.भिसे, एस.एस.जोशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले.

Post a Comment

0 Comments