माजी विद्यार्थ्यांच्या रक्तदाना देशभक्तीचे दर्शन

                                                                       

माजी विद्यार्थ्यांच्या रक्तदानातून  देशभक्तीचे दर्शन 

२६ रक्तदात्यांनी केले रक्तदान                                                          

वेब टीम नगर दि.२८ -दादा चौधरी विद्यालयाच्या १९९८ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा २६ जानेवारी रोजी झाला.विद्यार्थ्यांच्या राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या उपक्रमातून समाजाला प्रेरणा मिळावी या हेतूने सामाजिक भान ठेवून रक्तदान शिबीर घेतल्याबद्दल अष्टविनायक ब्लड बँकेतर्फे त्यांना सन्मान पत्रक देऊन गौरविण्यात आले.प्रजासत्ताक दिनानिमित्त दादा चौधरी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या प्रसंगी हिंदसेवा मंडळाचे उपाध्यक्ष अनंत पाठक,मुख्याध्यापक संजय मुदगल,जेष्ठ शिक्षिका निर्मलाताई भंडारी,विठ्ठल ढगे,गणेश तांबे,राहुल डागवाले,अतुल घोडेस्वार,वैभव बोरुडे,अरविंद वाव्हळ ,संदीप शिंदे,संदीप वाव्हळ,संदीप कुलकर्णी,विवेक भिडे,विशाल कांबळे,मयूर कुलकर्णी,मुकंद पतंगे ,पांडुरंग खरात,सुमन सादूल,अविनाश नेटके,आशुतोष खत्री,सागर रोहोकले,श्रीकांत मिसाळ,गणेश होनावळे,सर्वेश्वर वैकर,निलेश कडवा,गणेश गायकवाड,आशिष रघुवंशी,विजय खोमणे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments