नवसाला पावणारे नगरचे अष्टविनायक.....
वेब टीम नगर दि.२८ - शुभ कार्याची सुरुवात गणेश वंदनेने आपण करतो. गणपतींमध्ये अष्टविनायकाला मोठे महत्व आहे मात्र भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देणारे गणेशाची अनेक रूपे प्रत्येक गावात असतात.तसे ते नगरशहरातही आहे. काही घरगुती तर काही विश्वस्तांची स्थापना झालेली अष्टविनायकाची मंदिरे प्रसिद्ध आहेत.विशाल गणपती:
नगरचे ग्राम दैवत म्हणून प्रसिद्ध असलेला विशाल गणपतीचा मान पहिला.पूर्वाभिमुख उजव्या सोंडेचा साडे अकरा फूट उंचीच्या या गणेश मूर्तीचा उल्लेख गणेश पुराणात सापडतो चाहुराणा बुद्रुक , चाहुराणा खुर्द , माळीवाडा , मोरचुद नगर नालेगाव अश्या वस्त्या मिळून नगरची स्थापना झाली गावाच्या मध्यभागी असलेला हा गणपती ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो.1953 साली माळीवाडा पंच मंडळ देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली . जगन्नाथ आगरकर हे देवस्थान ट्रस्टचे पाहिले अध्यक्ष होते.सध्या अभय आगरकर हे विश्वस्थ अध्यक्ष म्हणून काम पाहत असून , अशोक कानडे हे सचिव आहेत नुकतच मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून पूर्ण मंदिर संगमरवरी करण्यात आले आहे देवाच्या गाभार्याला आतून चांदीने जडविण्यात आले आहे.
शमी गणपती :
सुमारे सव्वाशे ते एकशे चाळीस वर्षांपूर्वी शमीच्या झाडाच्या मुळापासून गणेश मूर्ती तयार झाली.आजही शमीच्या झाडाखाली ही मूर्ती आहे नवसाला पावणारं जागृत देवस्थान अशी या मंदिराची ख्याती आहे . मंदिराची व्यवस्था 1942 पासून ट्रस्ट द्वारे केली जाते.दर चतुर्थी आणि मंगळवारी गणपतीला अभिषेक केला जातो. काही वर्षांपूर्वीच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झालं आहे.
अक्षता गणपती:
कोणत्याही मंगल कार्याची सुरवात या गणपतीला अक्षता देऊन केली जाते.या मंदिराच्या जागी पूर्वी विहीर होती निर्माल्य अक्षता पायदळी तुडवल्या जाऊ नये म्हणून त्या विहरीत टाकल्या जात. अक्षतांपासून ही मूर्ती तयार झाल्याने अक्षता गणपती असे त्याचे नाव.सज्जनगड चे बालब्रम्हचारी श्रीधर स्वामी यांनी या मूर्तीची स्थापना केली. उजव्या सोंडेची पूर्वाभिमुख मूर्ती मांडी घातलेल्या अवस्थेत असून ही मूर्ती साडेतीनशे पूर्वीची असून हा पेशवेकालीन गणपती आहे.
पावन गणपती :
हा गणपती नवसाला पावणारा अशी लोकश्रद्धा असल्याने पावन गणपती असे त्याचे नाव पडले.स्वयंभू असलेल्या वाळके वाड्यातील गणेश मूर्तीची वाळके कुटुंबीय नित्य पूजा अर्चा करतात भाविक संकष्टीच्या दिवशी संकल्प करतात अंगरकीच्या दिवशी नवसपूर्ती करतात.या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम नुकतेच पूर्ण झाले.
मिरीकर वाड्यातील गणेश:
मिरीकर वाड्यातील गणपती हा उत्तराभिमुख असून उजव्या सोंडेची ही गणेशमूर्ती वाड्यातील एक कोनाड्यात आहे.घराच्या पायथ्याशी खोलात असलेल्या या मूर्तीला दर चतुर्थीला अभिषेक केला जातो.
मुळे वाड्यातील सिद्धिविनायक:
हा गणपती स्वयंभू असून तेजपुंज आहे.हा गणपती भास्करराव मुळे यांच्या वाड्यात आहे.या गणपतीला प्रदक्षिणा घातलेली चालत नाही. या गणपतीच्या मूर्तीवरील सिंदूरलेपन काढण्यात आल्यावर काळ्या पाषाणातील तेजस्वी मूर्ती प्रकट झाली.
वरदविनायक :
खकीदासबाबा या हटयोगी संताने सव्वाचारशे वर्षांपूर्वी काळ्या पाषाणातील वरद गणेशाची स्थापना केली.या मूर्तीच्या हातात कोणतेही आयुध नाही . दोन हात आशिर्वाद देताना उजव्या हातात मोदक व डावा हात मांडीवर ठेवलेला अश्या स्थितीत बसलेल्या गणपतीचे दर बुधवारी दर्शन घेतल्यास इच्छापूर्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.1936 मध्ये खाकीदासबाबा माहेश्वरीमठ ट्रस्टची स्थापना झाली आहे.
श्री सिद्धिविनायक:
सिद्धटेकच्या गणपतीची ही प्रतिकृती आहे.नागाचे जानवे धारण केलेली हातात परशु असलेली संगमरवरी गणेशाची ही मूर्ती असून अर्बन बँक रस्त्यावरील वसंत वाडेकर यांच्या वाड्यात साधारण दीडशे वर्षांपासून या गणपती चे अस्तित्व आहे.
असे हे अहमदनगर शहराचे अष्टविनायक भक्तांच्या नवसाला पावतात अशी नगरकरांची धारणा आहे.
0 Comments