राज ठाकरेंचा लातूर दौरा रद्द
प्रकृती अस्वास्थ्याचे कारण
वेब टीम मुंबई,दि.२८ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा मराठवाडा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनानंतर राज ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा होता, मात्र तो आता रद्द करुन पुढे ढकलण्यात आला आहे.
झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे यांचा हा पहिला मराठवाडा दौरा महत्वाचा होता. मात्र, प्रकृतीच्या कारणाने हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. या दौऱ्यात लातूर येथे आयोजित कृषी नवनिर्माण २०२० चं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मराठवाड्यात पक्षाच्या विस्तारासाठी राज ठाकरे यांच्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात होता .
मराठवाड्यातील एकमेव आमदार जाधव यांनी मनसेला रामराम केल्यानंतर मराठवाड्यात निर्माण झालेल्या पोकळी मुळे मनसेला मराठवाड्यात आपला जनाधार वाढवण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, यापूर्वी आपल्या अधिवेशनात प्रखर हिंदुत्वाची वाट धरल्यानंतर राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली आहे.
0 Comments