माझ्या मित्राचा ‘पानिपत’ चित्रपट पाहाच; राज ठाकरेंचं विशेष आवाहन


मुंबई : येत्या 6 डिसेंबरला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्याच पार्शभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्या मित्राचा पानिपत हा चित्रपट नक्की पाहा, असं आवाहन केलं आहे.
पानिपतची लढाई मऱ्हाटेशाहीची लढाई म्हणून न पाहता राजकीय सांस्कृतिक आक्रमनांना थोपावणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याचा अविष्कार होता. मनगटात इतकी ताकद असणारी मऱ्हाटेशाही नक्की कुठे कमी पडली हे पाहण्यासाठी पानिपतची लढाई पाहावी लागेल, असं ट्वीट राज ठाकरेंनी केलं आहे.
पानिपतची लढाई पाहण्यासाठी माझा मित्र आशुतोष गोवारीकर यांचा पानिपत हा चित्रपट फक्त मराठी माणसानेच नव्हे तर तमाम भारतीयांनी बघावा, असं आवाहन राज यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केलं आहे.
दरम्यान, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत हा चित्रपट येत्या 6 डिसेंबरला  प्रदर्शित होत आहे. त्याचपार्श्वभूमीवर राज यांचं हे ट्वीट महत्वाचं आहे.

Post a Comment

0 Comments