मनीष पांडेने कर्नाटकला चॅम्पियन बनवल्याच्या दुसऱ्या दिवशी केला विवाह


मुंबई - भारतीय फलंदाज मनीष पांडेने सोमवारी तामिळ अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत विवाह केला. मनीषने रविवारी आपल्या कर्नाटक संघाला दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली. त्याने सुरतमध्ये झालेल्या फायनलमध्ये तामिळनाडूविरुद्ध ४५ चेंडूचा सामना करताना ६० धावांची खेळी केली. मनीषने सामन्यानंतर मुलाखतीत आपल्या विवाहाबद्दल सर्वांना माहिती दिली.

Post a Comment

0 Comments