'भारतरत्न' ही सरकारची निवडणुकीसाठीची चलाखी, सरकारला उशीरा जाग : सुप्रिया सुळे





मुंबई - भारतीय जनता पक्षाने आज (15 ऑक्टोबर) त्यांचे संकल्पपत्र (जाहीरनामा) जाहीर केले असून यात स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात आपण ही मागणी मागील 2 ते 3 वर्षांपासून लोकसभेत करत होतो. त्यावेळीही यांचंच सरकार होतं, मग निवडणुका आल्यावरच यांना भारतरत्न का आठवला? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

भाजपचा संकल्पनामा म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस असल्याची टीकाही सुळे यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेवरून सध्या सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं सांगत भूतकाळ पुन्हा उकरून काढण्यापेक्षा वर्तमानात आपल्यापुढे काय समस्या आहेत? त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन यावेळी सुप्रिया सुळे यांनी केलं.

दरम्यान, महाराष्ट्रात जर तुमचं इतकं चांगलं काम असेल आणि पैलवान तयार असतील, तर दिल्लीवरून मॉनिटर कशाला बोलवावे लागतात? असा सवाल उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला.

Post a Comment

0 Comments