भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

वेब टीम : दिल्ली
ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंट हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने न्यूझीलंडवर 5-0 असा मोठा विजय मिळवला.

या विजयासह भारताने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या विजयामुळे भारतीय संघाने स्पर्धेतील राऊंड रॉबीन फेरीत न्यूझीलंडने केलेल्या पराभवाचा वचपा काढला.

न्यूझीलंडविरूद्धच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मैदानाच्या मध्यरेषेवर खेळ खेळण्यावर अधिक भर दिला होता.

भारताने सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु त्यावर गोल करण्यात अपयश आले. मात्र कर्णधार हरमनप्रीतने पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली.

लगेचच शमशेर सिंगने 18 व्या मिनिटाला गोल करून आघाडी वाढवली. त्यानंतर पुढच्या 10 मिनिटात झटपट 3 गोल झाले.

निलकांत शर्माने 22 व्या मिनिटाला, गुरसाहबजीत सिंगने 26 व्या मिनिटाला आणि मनदीप सिंगने 27 व्या मिनिटाला गोल करून भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली आणि ती आघाडी शेवटपर्यंत टिकवली. राऊंड रॉबीन फेरीत न्यूझीलंडने भारताला 2-1 ने पराभूत केले होते.

Post a Comment

0 Comments