इंग्लंडचा डाव गडगडला : ६७ धावांत ऑलआउट

वेब टीम : मेलबर्न
ॲशेस मालिकेतल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा अवघ्या ६७ धावांवर खुर्दा उडाला आहे.

कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर गडगडला. ही इंग्लंडची १९४८ नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची नीचांकी धावसंख्या ठरली.

लीड्स मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी जोफ्रा आर्चरच्या तिखट माऱ्यामुळे इंग्लंडला ऑस्ट्रेलियाचा डाव १७९ धावांवर रोखता आला होता.

आज दुसऱ्या दिवशी मात्र इंग्लंडला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. इंग्लंडच्या संघाला केवळ २९ षटकांचाच सामना करता आला. जो डेनलीच्या १२ धावा वगळता कुठल्याच फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

जोश हॅझलवूडने ५ बळी घेत इंग्लिश फलंदाजीची हवाच काढुन घेतली. कमिन्सने ३ तर पॅटीसनने २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावासाठी ११२ धावांची आघाडी मिळाली.

Post a Comment

0 Comments