चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ

वेब टीम : दिल्ली
माजी केंद्रीय अर्थमंत्री नेते पी. चिदंबरम यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.त्यांना ३० ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

चिदंबरम यांना आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास राउज ऍव्हेन्यू न्यायालयात हजर केले.यावेळी सीबीआयचे अधिकारी आणि दिल्ली पोलीस उपस्थित होते.

त्यावेळी चिदंबरम यांची अधिक चौकशी करायची असल्याने पाच दिवसांची रिमांड देण्याची मागणी सीबीआयने न्यायालयाला केली.

त्यावेळी गेल्या चार दिवसांत तुम्ही काय चौकशी केली? असा सवाल न्यायालयाने सीबीआयला केला. त्यावर गेल्या चार दिवसांत आम्ही चिदंबरम यांना सर्व कागदपत्रे दाखवली. त्याचे रेकॉर्डिंगही केले.

तसेच या प्रकरणातील एका आरोपीला आजच त्यांच्यासमोर हजर केले. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आणखी एक-दोन आरोपींना त्यांच्यासमोर हजर करून काही प्रश्न विचारायचे असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments